Uncategorized

न.प. नी उभारलेले सोलर ठरत आहे धोकादायक

Spread the love

 

दलित वस्ती सोलर प्रकाशा पासून वंचित

घाटंजी ता. प्रतिनिधि-

घाटंजी- शहरात उजेड करण्यासाठी लाखोचा खर्च करुन मागिल प्रशासक यांचे प्रयत्नाणी घाटंजीत सोलर लाईट उभारणी केली. गावच्या काही भागात सोलर लाइट लागल्याने तो भाग प्रकाशित झाला मात्र काही भागातील ही लाईट केवळ दीवास्वप्न ठरुन बंद पडली. मुख्य म्हणजे मागिल काही दीवसापासून गावात वातावरण बदल झाल्याने वादळी वा-यात ह्या सोलर लाईटचे पॅनल घाटी येथिल शाळे समोरिल उडाले होते. तर गावातील विशीष्ठ भागात सोलर पैनल अगदी जवळ जवळ लावल्या गेले आणि दलित वस्तीत मात्र अद्याप पर्यंत या लाईटचा प्रकाश पडलेलाच नाही.वा-यामुळे हे उभारलेले सोलर पोल खोल व मजबूत नसल्याने पडण्याचेही भय असून त्यामूळे अच्यानक आलेल्या अवकाळी वा-यामूळे सोलर पडला तर जिवीतहाणीही नाकारता येत नाही. जिवीतहाणी झालीच तर याला जवाबदारी कोताही धरायचे? त्यामूळे सोलर लाईट उभारणीत आलेल्या या डोलायमाण प्रक्रियाची सखोल चौकसी व्हावी ही मांगणी आता घाटंजीकर नागरिकातून जोर धरत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close