सामाजिक
घाटंजी न.प. क्र.५च्या विद्यार्थिनीची सैनिक शाळे करीता निवड.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी येथिल न.प.शाळा क्रं ५ च्या इयत्ता ७ ची विद्यार्थिनी कु. महेश्वरी विजय चापळकर हीची परभणी धरमपूर येथिल सैनिकी शाळेत निवड झाली.या निमित्ताने न.प. शाळेच्या वतीने तीचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रम अध्यक्षस्थानी न.प. मुख्याधिकारी अमोल माळकर साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधूताई सिडाम उपस्थित होत्या त्यांचे हस्ते महेश्वरी चा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमचे प्रास्ताविक बंडीवार सर यांनी केले.उपस्थित विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन गावंडे यांचे लाभले. कार्यक्रम संचालन कपिले यांनी केले तर,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका आणि कु.वंजारे,कु. मनवर नी प्रयत्न केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1