नकोडा ग्रामपंचायत व विश्वाभारती ग्रामसंघा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा.
घुगघुस, प्रतिनिधी/श्रिनिवास सुद्धाला.
ग्रामपंचायत नकोडा व विश्वभारती ग्रामसंघ नकोडा यांच्या संयुक्त वतीने बुधवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षा तनुश्री बांदुरकर माजी सरपंच नकोडा तथा विद्यमान सदस्या ग्रा.पं.नकोडा, उद्घाटक रंजना शंकर, मार्गदर्शक निलेश देवतळे,भारत कळसकर,सविता माणूसमारे,सोनाली जांभुळकर विशेष अतिथी म्हणून माजी जि.प.सभापती बि्जभुषण पाझारे, सविता कोवे माजी पं स.सदस्या ,किरण बांदुरकर सरपंच नकोडा,मंगेश राजगडावर उपसरपंच नकोडा, राजेंद्र भानोसे ग्राम विकास अधिकारी,सुजाता गिद्धे ग्रामपंचायत सदस्या,रजत तुराणकर सदस्य ग्रा.पं, मुख्याध्यापक मोहन फरपडकर,शिक्षिका भुसारी मॅडम,माजी ग्रा.पं सदस्या ममता उरकुडे मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मेळाव्याची सुरुवात केली.उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले महिला मेळाव्यात महिलां साठी विविध खेळांचे आयोजन केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन रंजना काकडे यांनी तर आभारप्रदर्शन वर्षा झाडे अध्यक्षा विश्वाभारती ग्रामसंघ नकोडा यांनी मानले.कार्यक्रमाला गावांतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची यशस्वी साठी विश्व भारती ग्रामसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अथक प्रयास केले