दि.इंग्लिश हायस्कूल येथून बॅड पथकासह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची मिरवणूक, मुली बनल्या सावित्रीबाईच्या लेकी, नाट्यकृतीतून साकारल्या सावित्रीचे जीवन चरित्र.

नेर:- नवनाथ दरोई
भारतातील पहिली महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, व समस्त स्त्रियांना अंधारातून उजेडाची वाट दाखवीणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने दी इंग्लिश हायस्कूल येथून बॅड पथकासह हनुमान नगर,मारवाडी चौक, तेलीपुरा, बारिपुरा,सराफा लाईन, नगरपरिषद ते यवतमाळ अमरावती महामार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सावित्रीबाईच्या लेकींनी एक नाट्यकृती सादर केली. या नाट्यकृतीमध्ये सावित्री चे लग्न, महात्मा ज्योतिबा यांना घराबाहेर काढून देणे, फातिमानी त्यांना दिलेला आसरा, मुलाला दत्तक घेणे, पांडुरंगला प्लेगमध्ये दवाखान्यात नेणे, आणि त्या मध्येच सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू होणे.इत्यादी दृश्य या नाट्यकृतीत दाखविण्यात आली. दिग्दर्शन, सोनाली देशमुख, रेश्मी बोभाटे प्रज्ञा आवारे किरण मन्येवर, यांनी केले.यावेळी दि इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन ऊईके,मनोज दुधे, के.बी. राठोड,शाम गुल्हाने व शिक्षक वर्ग,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.