क्राइम

माता तू वैरिणी; शीतपेयातून झोपेचे औषध देत स्वतःच्या मुलाला संपवलं

Spread the love

आईच्या या गोष्टीला विरोध करणे जीवावर बेतले

बेळगाव /क्राईम रिपोर्टर

आई मुलाला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त काळजीने जपते असे म्हटल्या जाते.पण बेळगाव येथे मुलगा आईच्या अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. शीतपेयात झोपेचे औषध देऊन तो बेशुद्ध झाल्यावर ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली.

 

आईने मुलाला संपवण्याचा कट रचला


विजय नारायण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो आपल्यासोबत बेळगावातील मालमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. आईच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने कट रचून  विजयची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृताची आई ‘मीना नारायण’ आणि ‘राकेश जामुनी’ यांच्यात अनैतिक संबंध होते आणि मृत विजय याला विरोध करत होता. यामुळेच मुलाला संपवण्याचा कट मीनाने रचला अन् पोटच्या पोराला संपवलं.

कोल्ड ड्रिंकच्या मदतीने झोपेच्या गोळ्या दिल्या


राकेशने विजयला कारमधून एका ठिकाणी नेले, तिथे अन्य आरोपींच्या मदतीने कोल्ड ड्रिंकच्या मदतीने झोपेच्या गोळ्या मिसळून विजयला पाजण्यात आलं. राकेश त्यानंतर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या गळ्याभोवती ओढणी आवळून खून करण्यात आला. सचिन कांबळे, मनोज कांबळे, तम्मण्णा कांबळे आणि एकनाथ कांबळे यांच्या मदतीने मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगतच्या गटारात टाकला गेला आणि सर्व आरोपी पसार झाले होते.

आईसह सहा जणांना अटक

पोलिसांनी या प्रकरणानंतर तातडीने कारवाई सुरू केली. 3 नोव्हेंबर रोजी केएलई छत्रीजवळील गटारात मृतदेह आढळल्यानंतर मालमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणात आईसह सहा जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close