पुणे पुन्हा हादरले , बुधवार पेठेत महिलेचा खून

पुणे / प्रतिनिधी
राज्यात लागोपाठ घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे राज्यात कायदा व्यवस्था आहे किंवा नाही असा प्रश्न आता विरोधाकच नव्हे तर सामान्य जनतेकडून देखील विचारल्या जात आहे. पूणे , नाशिक ,नागपूर सह अन्य शहरात खून म्हणजे एखाद्या मुंगी किंवा माकोड्याला मारणे सारखे झाले आहे. बुधवार पेठेत नुकत्याच झालेल्या एका महिलेचा हत्येमुळे पुणे हादरले आहे.
पुणे शहरातील एका हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यात खुनाचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी महिलेचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा थोरात ही फिरस्ती असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यव्यसाय करतो. 10 ते 15 दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल थोरातने चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने व गौरव यांनी थोरात बाईकडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी बाणेरमध्ये घटना
बाणेर परिसरात एका सराफी व्यावसायिकाने मित्रावर गोळ्या झाडून नंतर स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकारात सराफी व्यावसायिकाचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून हल्लेखोराने स्वतः:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातही त्यास्वरूपाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.



