अंजनगाव सुर्जी येथे शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न
अंजनगाव सूर्जी / प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव इतरही उत्सवानिमित्त नुकतीच शहरातील प्रभा मंगलम येथे शांतता समितीची बैठक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांचे उपस्थितीत संपन्न झाली
अंजनगाव सुर्जी तालुका नाहीतर पूर्ण भारतभर गणपती बाप्पा चे आगमन तसेच
ईद-मिलाद चे असे दोन्ही हिंदू मुस्लिम बांधवांचे सण येत असल्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवात एकोपाचे संबंध कायम राहावे सर्वांनी गुण्यागोविंदाने साजरे करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी उपस्थित गणपती मंडळाचे पदाधिकारी यांना केले यावेळी बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी रघुनाथ नायडू .तहसीलदार पुष्पा सोळंके .अंजनगाव ठाणेदार प्रकाश अहिरे. विनोद खेडकर गटविकास अधिकारी. उपमुख्यधिकारी गोविंद त्रिपुरारी,रहिमपूर पोलीस स्टेशन चे अनंत वळतकर. प्रथोट पोलीस स्टेशन ठाणेदार पुंड .सार्वजनिक बांधकाम विभाग. नगरपरिषद इलेक्ट्रिक बोर्ड यांचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी इमाम मौलाना तसेच सार्वजनिक गणपतीचे पदाधिकारी .पोलीस पाटील समाजसेवक .महिला .पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळीपोलीस अधीक्षक यांनी मंडळांना मार्गदर्शन करताना म्हटले की एकोप्याने सर्व जाती धर्म मिळून सण साजरे करा कुठल्याच आपल्या
सणाला गालबोट लागू देऊ नका .सर्वांनी सहकार्य करावे अशी मी तुमच्याकडून शाश्वत घेतो आणि गणपती बाप्पा तसेच ईद मिलाद हिंदू मुस्लिम बांधवांना सणाच्या शुभेच्छा दिल्या .