वडिलादेखत २१ वर्षीय मुलगा वाहून गेला

तिवसा येथील उध्व वर्धा कालव्यात घडली घटना.*
रोहित गवई
तालुका प्रतिनिधी तिवसा
तिवसा दि.१८वडिलांच्या डोळ्यात देखत अमरावती येथील २१वर्षीय तरुण मुलगा आज सकाळी ११:३०वाजता दरम्यान तिवसा ते सातरगाव मार्गावर असलेल्या उध्व वर्धा कालव्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली.ओम अरविंद सहारे रा. सबनीस प्लॉट अमरावती असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. कालव्यात मुलगा वाहून गेल्याची वार्ता पसरताच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मुलाचे वडील अरविंद सहारे हे एका कंत्राटदाराकडे सुपरवायझर म्हणून कामाला असल्यामुळे आज घरून नेहमीप्रमाणे निघत असताना मुलांने हट्ट केला बाबा आज मी तुमच्या सोबत येतो,त्यामुळे वडील आणि मुलगा दुचाकीने तिवसा आले. याच दरम्यान वडील सातरगाव मार्गावर असलेल्या वनविभागाच्या रोपवन परिसराच्या गेटच्या कामाचे फोटो घेत असताना धुळाने भरलेले पाय धुण्यासाठी ओम हा जवळच असलेल्या कालव्यावर गेला व पाय धुवत असताना त्याचा अचानक पाय घसरला व तो पाण्यात पडला.अगदी डोळ्यादेखत मुलगा कालव्याच्या पाण्यात वाहत जातानाचे दृश्य पाहून वडील सैरावैरा कालव्याने धावत निघाले आणि मदतसाठी हाक देऊ लागले परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलगा क्षणात वाहत गेला.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांनी अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले.यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकाने काही तास शोध मोहीम राबविली.वृत्तलीहेस्तोवर मुलाचे शोध कार्य सुरू होते.यावेळी घटनास्थळी महसूल व पोलिस विभाग आमदार राजेश वानखडे यांच्या पत्नी आरती वानखडे,छाया दंडाळे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर, आपदा मित्र संदीप दाहाट,वैभव तांबे, किशोर गोरडे,नगरसेवक सचिन गोरे,अविनाश पांडे उपस्थित होते.
—————————-
अभियंता होण्याचे स्वप्न भंगले..
वडील अरविंद सहारे हे सुपरवायझर म्हणून काम करत असल्यामुळे वडिलांची ओम हा अभियंता व्हावा अशी इच्छा होती,त्याचे अभियंताचे शिक्षण देखील सुरु होते मात्र नियतीने घात केल्याने वडिलांचे स्वप्न भंगले आणि वडिलासह नातेवाईकांनीं घटनास्थळीच आपला मोठा हंबरडा फोडला.
————————




