क्राइम

घरी बोलावून ६० वर्षीय वृद्धाकडून ८ वर्षाच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण

Spread the love

कोणाला सांगितल्यास हात पाय तोडण्याची दिली धमकी 

नागपूर / क्राईम रिपोर्टर 

               शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या वृद्धाने ८ वर्षाच्या चिमुकलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. .

आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यासोबत वारंवार गैरवर्तन केले. एवढेच नाही तर, तर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास हात-पाय तोडण्याची धमकीही दिली. अखेर चिमुरडीने धाडस करून कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

शेजारीच राहणाऱ्या वृद्धाचे कृत्य

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित आठ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. परिसरातच आरोपी नेहरू मारुती पाचरे (वय ६०) हा राहतो. आरोपीची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख होती. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला जात होता. दरम्यान, मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला एकटी पाहून आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर त्याने मुलीसोबत गैरवर्तन आणि लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे चिमुरडी घाबरली. मात्र, आरोपीने तिला याबाबत कोणालाही काही सांगू नकोस, अन्यथा हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत सांगितले आहे.

यापूर्वीही अनेकदा गैरवर्तन केल्याचा आरोप

विशेष म्हणजे, यापूर्वीही अनेकदा मुलीसोबत अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याची माहिती आहे. धमकीमुळे चिमुरडीने सुरुवातीला घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, अखेर तिने हिंमत करून कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा, आरोपीला अटक

नंदनवन पोलिसांनी आरोपी नेहरू मारुती पाचरे याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणात आरोपीने यापूर्वीही मुलीसोबत गैरवर्तन केले होते का, तसेच त्याने मुलीला धमकावून हा प्रकार लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडूनच चिमुरडीसोबत असा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close