सामाजिक

आर्वी मतदार संघाला नवीन नेतृत्वाची गरज – डॉ.राजपाल भगत

Spread the love

विधानसभा निवडणूकीच्या दोन वर्षानंतर आर्वी विधानसभेचा विकास पाहत आगामी काळात नविन नेतृत्वाची गरज. जनतेने संधी दिल्यास जनतेचीच सेवा. डाॅ राजपाल भगत.

आर्वी: विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर दोन वर्ष ओलांडली असून निवडणुकीपूर्वी जनतेला दिल्या गेलेल्या आश्वासनाला तळा गेला आहे. तळेगाव येथे होवू पहाणारे मेडिकल काॅलेज रातोरात हिंगणघाटला स्थलांतरीत झाले आहे. आर्वी तळेगाव या बारा किलोमीटर महामार्ग अजूनही पुर्णत्वास आला नाही. विकासाच्या नावावर आर्वी विधानसभेत करोडो रूपयाचा निधी आणला गेला असला तरी तो विधानसभेच्या विकासासाठी की स्वतःच ठेकेदारीचा व्यवसाय करणायासाठी हे जनतेच्या लक्षात आलं नाही. स्थानिक ठेकेदार डबघाईस आले असून करोडो रूपयाचे काॅन्ट्रॅक्ट जिल्ह्याबाहेरील काॅन्ट्रॅक्टदाराला दिल्याचे जाणवते. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गावरील निर्धारित पाच फुट लांबीचे रस्ता दुभाजक सत्तेचा गैरवापर करून अवघ्या दिड फुटावर आणून ठेवला आहे. संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर्वी शहरात शासकीय कामे पोलीस बंदोबस्तात करण्याची वेळ देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्वी शहरात पाहायला मिळाली. पोलीस यंत्रणा कोलमडली असून ती कोणातरी एका इशाऱ्यावर चालत आहे. मागील दोन वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढलेले आहे. शहरातील व विधानसभेतील महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आजही विचाराधीन आहे. नागरीकांमध्ये बंधुभावाची भावना पुर्णता संपुष्टात आली आहे. पुर्वी दारूचे दुकाने फक्त उदरनिर्वाहासाठी केले जात होते आज ते एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात चालू आहे. आर्वी आष्टी कारंजा या तिन्ही तालुक्यात आरोग्य सेवा ही पुर्णपणे कोलमडली असून आर्वीतील ग्रामीण रुग्णालयात अजूनही प्रसूतीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध आहे. आर्वी शहराबाहेर जाणारा बायपास नेमका कोणता हे कळायला अजूनही जागा उरली नाही. एम.आय.डीन.सी च्या प्रतिक्षेत तरूण युवा निराश झाला आहे. शहरात होणारे बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. ऐतिहासिक कालीन करोडो रुपये किमतीची पाईपलाईन ची चोरी शहरात झाली आहे. सट्टयाच्या धंध्यासह आता विधानसभेत ड्रग्ज चा धंधा सुद्धा राजरोस पणे केला जात आहे. मराठी शाळेचे विलिनीकरण सुद्धा झाले आहे. एकाच पक्षात दोन नेत्यामध्ये कमालीचा विरोधाभास विधानसभेत पहायला मिळत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर कमालीचा दवाब या दोन वर्षांत दिसतो. प्रतिनिधी विषयी कधी न दिसणारी निराशा जनतेत या दोन वर्षांत पहायला मिळत आहे. या सर्व गोष्टीमुळे जनतेला प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे. आगामी काळात विधानसभेत विधानसभेत होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत नेतृत्व बदलण्याची मनिषा जनतेत निर्माण झाल्याने जनतेने संधी दिल्यास फक्त जनतेचीच सेवा. हा ठाम निश्चय राष्ट्रवादी कांग्रेस श.प सामाजिक न्याय चे राज्य संघटक सचिव डाॅ राजपाल भगत यांच्या बोलण्यात जाणवतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close