अंजनगावात आज शिवजयंतीची भव्य शोभायात्रा

शिवसेना शिंदे गटाचे आयोजन
अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे )
****** तिथी प्रमाणे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या धड्याक्यात साजरी करण्यात येत असून आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजता लेंधे कॉम्प्लेक्स जवळून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना इसोकार यांनी सांगितले
****** शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी प्रमाणे येणारी जयंती गुरुवारी (ता.२८) ला शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात साजरी केल्या जात असून येथील दर्यापूर रोडवरील लेंधे कॉम्प्लेक्स जवळून सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या नियोजन साठी चार दिवसांपूर्वी पान अटाई येथील शिवसेना कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यात एकमताने या कार्यक्रमाचा निर्णय घेण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मुन्ना इसोकार,राजू गिरी,अक्षय बोरकर,गजानन पाटील,रितेश पाटील,विशाल रमेकर, प्रथमेश कोकाटे,नवज्योत वानखडे,आकाश मोगरे,विक्की दुर्गे,रोहित गारोडेकर,दनाल आग्रे,अक्षय इंगळे,आकाश ठोकळ,नितीन राऊत,सुमित महुलकर,रोशन खोडके,चेतन इचे,निलेश मोरे,रघुवीर पायघन,यश तांबे,हिमांशू अब्रुक,तन्मय लेंधे,विवेक मोरे,हर्षल गौर,योगेश गौर,नितीन हसुलकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते