क्राइम

शंका आणि गरोदर पत्नीची शीतपेयात डांबराच्या गोळ्या देऊन हत्या

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                   पत्नी बद्दल मनात असलेली शंका आणि राग याचे पर्यवसान गरोदर पत्नीच्या हत्येत झाले आहे. पतीने पत्नीला शीतपेयातून डांबराच्या गोळ्या दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चेंबूर परिसरात खळबळ माजली आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून आरसीएफ पोलिसांनी आरोपी प्रियकराला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.वादानंतर शीतपेयातून दिलं विष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेला पीडित महिला आणि तिचा प्रियकर आशिष मगर यांच्यात चारित्र्याच्या संशयातून जोरदार वाद झाला होता. काही वेळाने वाद मिटल्याचे भासवून आशिषने तिला पिण्यासाठी शीतपेय दिलं. मात्र, त्या शीतपेयात डांबराच्या गोळ्या मिसळल्याची पुसटशीही कल्पना त्या पीडित महिलेला नव्हती. तिने ते पेय प्राशन करताच तिला प्रचंड त्रास सुरू झाला आणि अचानक उलट्या होऊ लागल्या.

सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार सामान्य आजारपणाचा वाटल्याने त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं. परंतु, त्रास सातत्याने वाढत गेला आणि महिला चक्कर येऊन खाली कोसळली. तेव्हा कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्या रुग्णालयाने शताब्दी रुग्णालय रेफर केलं. अधिक उपचारासाठी पीडितेला शताब्दी रुग्णालयात हलवलं. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीची कबुली

मृत्यूपूर्वी पीडित महिलेने प्रियकर आशिषने दिलेल्या शीतपेयानंतरच त्रास सुरू झाल्याची माहिती आपल्या घरच्यांना दिली होती. कुटुंबीयांनी ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. तपासादरम्यान सुरुवातीला आरोपी आशिषने उडवाउडवीची उत्तरं देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वतःच्या गरोदर प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही विषबाधेमुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आशिष मगरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाकडून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका गरोदर महिलेची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close