वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार अर्धा किलोमीटर नेले फरफटत.
मोहाडी. ता. प्र.
भंडारा तालुक्यातील माटो रा येथील राजू ताराचंद सेलोकर 35 हा दि .24 जानेवारी रोजी सकाळी आपल्या शेतावर गेला असता दडी मारून बसलेल्या वाघाने हल्ला करून राजूस जागीच ठार करून अर्धा किलोमीटर त्याची प्रेत फरकटत नेले.
माटोरा हे गाव कोका अभयारण्यास लागून असून माटोरा सालेहेटी इंजेवाडा सर्पेवाडा कोका दुधारा हे गाव जंगल व्याप्त असून येथे घनदाट जंगलाचे साम्राज्य आहे व या परिसरात मोठ्या संख्येने जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे या परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन व शेती हा आहे त्यामुळे करचखेडा लिफ्टचे पाणी उन्हाळी धानासाठी देण्यात आले त्यामुळे परे भरण्याच्या उद्देशाने शेतीची पाहणी करण्याकरिता राजू ताराचंद सेलोकर 35 हा अविवाहित युवक सकाळी 8 वाजताच्या सुमारास शेतावर गेला होता यांचे शेत माटोरा ते सालेहेटी रोडवर आहे राजू हा शेतावर गेला असता अनेक शेतांवर लोक उपस्थित होते परंतु कुणाचेही लक्ष त्या वाघावर नव्हते दडी मारून बसलेल्या वाघाने राजूवर अचानक झळप टाकून पकडले तेव्हा ओरडण्याची संधी दिली नाही शेत परिसरातील लोकांना याची चाहूल सुद्धा लागले नाही व राजु स जागीच ठार केले व त्याच्या छातीचा मानेचा व इतर अवयव खाल्ले व प्रेत अर्धा किलोमीटर फ रकटत नेले.
खूप उशीर झाला पण बाळ घरी नाही आला.
. राजू शेतावर जाऊन खूप वेळ झाला पण घरी परत नाही आला त्यामुळे म्हाताऱ्या आई-वडिलांना 10 वाजेच्या सुमारास मुलाची चिंता भेडसा ऊ लागली त्यामुळे शेतावर शोध घेण्याकरिता गेले असता राजू तेथे दिसला नाही शोधाशोध केली असता फरकटत ने ल्याचे दिसल्याने आरडा ओरड झाली व गावातील व परिसरातील लोक धावत येऊन शोधाशोध केली असता अर्धा किलोमीटर वाघाने राजूचे प्रेत फरकटक नेले असल्याचे व शरीराचे भाग खाण्याचे निदर्शनास आले.
आई-वडिलांची काठी तुटली.
राजू व त्याचा एक मोठा भाऊ असा दोन भावांचा परिवार परंतु मोठा भाऊ आपल्या परिवारासह आई-वडिलांपासून वेगळा राहत असून राजू हा आपल्या आई-वडिलांना पालन पोषन करत असून म्हातारपणाचा आसरा होता परंतु काळाने त्याच्यावर झडप टाकून आई-वडिलांची काठी क्षणार्धात तोडून टाकली.
नागझिरा व कोका या अभयारण्यात बाहेरून अनेक वाघ व इतर खुक्कार प्राणीआणून सोडले आहेत त्यात नरभक्षक वाघांचा सुद्धा समावेश आहे कोणता वाघ कोणता प्राणी कसा आहे हे जंगल व्याप्त परिसरातील लोकांना माहित नाही शिकारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे व जंगलात जाण्यास मनाई असल्यामुळे वन्यप्राणी जंगलात न राहता गावाशेजारी व शेत शिवारात आपले वास्तव्य करीत आहेत व वन विभाग सुद्धा याची माहिती देत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या दररोजच्या कामावर जातात व असे अपघात होतात मृत झालेल्या लोकांच्या परिवारांना देते फक्त शांतवना व तुटपुंजी आर्थिक मदत. त्यामुळे लोक आपल्या पोटाची खिंडगी बुजविण्याकरिता सकाळ झाली की आपल्या कामाला लागतात परंतु वन्यप्राणी त्या लोकांचे घात करतात.
वनविभाग व कारधा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केलं असून प्रेत स्वच्छदना करीता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठवण्यात आले आहे.
दि.24 जानेवारी रोजी सायंकाळी शोकानाकूल वातावरणात स्थानीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेने कोका भंडारा (इंजेवाडा सर्पेवाडा सालेहेटी माटोरा ) या मार्गाने येणाऱ्या लोकांसाठी व परिसरातील जनतेसाठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1