महाराष्ट्रतील बेरोजगाराना बेरोजगार भत्ता देण्यात यावा
राष्टीय बंजारा परिषद संजय मदन आडे ची मागणी
राजेश सोनुने तालुका प्रतिनिधी
राज्यातील बेरोजगाराची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. पदवी, पदवीका पूर्ण केलेल्याची संख्या लाखोच्या घरात आहे.त्या सर्वाना रोजगार देणे शक्य नाही बेरोजगाराना दिलासा देण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी बेरोजगार भत्ता सुरु केला आहे.
राजस्थान, छ्तीसगड मध्ये बेरोजगार तरुण,तरुणीना भत्ता दिला जातो त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्यावा, बेरोजगार भत्ता न दिल्यास बेरोजगारातर्फे जन आंदोलन करण्यात येईल अशी मागणीसंजय मदन आडे विदर्भ कार्याध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत केली आहे यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते.विकास राठोड काटखेडा, सुनिल चव्हाण हिवळणी, संजय राठोड मोहा,विजय जाधव काटखेडा,सतीश चव्हाण असोली