विदेश

अंतर्वस्ता बाबत महिलेने केलेली ती पोस्ट होतेय तुफान व्हायरल

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

सोशल मीडिया हा जनतेसाठी मनातील भावना व्यक्त करणारे व्यासपीठ बनले आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही गमतीदार, काही बोधात्मक ,काही हॉरर तर काही अन्य प्रकारचे असतात. पण सध्या एका महिलेचा तिने स्वतःच्या  अंतर्वस्त्रा बाबत व्हिडीओ शेअर केला आहे. तो तुफान व्हायरल होतोय.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की  ही पोस्ट नेमकी आहे तरी काय? ते पाहुयात. महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या अंडरविअरबाबत ही पोस्ट केली आहे. तिच्या बॉयफ्रेंडची एक विचित्र सवय आहे, जी घाणेरडी असल्याचं तिने म्हटलं आहे.

याबाबत तिने आपलं मत मांडत इतर लोकांनाही याबाबत एक प्रश्न विचारला आहे. महिलेच्या या प्रश्नाला बऱ्याच जणांनी उत्तरंही दिली आहेत. महिलेने रेडिट या सोशल मीडिया साइटवर ही पोस्ट केली आहे. तुम्ही तुमची अंडरविअर आणि मोजे दररोज बदलता की जेव्हा अंघोळ करता तेव्हा?

असा प्रश्न तिने विचारला आहे. आता हा असा प्रश्न पाहून तुम्ही गोंधळात पडला असेल. तिने असं का विचारलं, तिला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तुम्ही तिची सविस्तर पोस्ट वाचल्यावरच समजेल.  महिला म्हणाली, “मी अंघोळ करो वा न करो पण माझे अंडरविअर आणि मोजे दररोज सकाळी बदलते.

माझा पार्टनर मात्र जेव्हा तो अंघोळ करतो तेव्हाच अंडरविअर आणि मोजे बदलतो. मी दररोज बदलते ते त्याला विचिक्र वाटतं. आम्हा दोघांपैकी कोण योग्य आहे?”, असा सवाल तिने केला आहे. रेडिटवर AskUK फोरमवर महिलेची ही पोस्ट आहे.

महिलेच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. बहुतेकांनी तिची बाजू घेतली आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडची सवय घाणेरडी असल्याचं म्हटलं आहे. तर कही जणांनी तिचा बॉयफ्रेंड दररोज अंघोळ करत नाही का? असा सवालही केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close