तो ग्राहकाची उरलेली बिअर प्यायला आणि जमिनीवर कोसळला

चंद्रपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
बिअर बार मध्ये काम।करणाऱ्या वेटर ने ग्राहकाची उरलेली अर्धी बिअर प्यायली आणि तो जमीनिवर कोसळला. तेथिल अन्य लोकांनी त्याला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत्यू कधी कोणाला कसे आणि कुठे गाठेल याचा काही नेम नसतो. मृत्यू आला की साधी ठेच लागून मनुष्य जरी पडला तरी तो ‘राम ‘ म्हणतो. चंद्रपुरातील एक घटनेवरुन. एका वेटरला त्याच्या एका विचित्र सवयीमुळे जीव गमवावा लागला आहे. एका बिअर बारमध्ये ग्राहकाने पिऊन अर्धवट सोडलेली बिअर तो वेटर प्यायला आणि त्याचा जागीच मृत्यूझाल्याची विचित्र घटना राजुऱ्यात घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातल्या सोमनाथपूर परिसरात हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. या परिसरातीव मटण मार्केटच्या बाजूला असलेल्या एका बिअर बारमध्ये अभय लांडे नावाच तरुण बिअर पिण्यासाठी आला. त्याने बिअर मागवली मात्र ती पूर्ण न पिता तो अर्धवट पिऊन तो बारमधून निघून गेला. टेबलवरील ग्लास उचलण्यास आलेल्या वेटर भगवान गेडामला ती बियर पिण्याचा मोह झाला. आणिकुणाचं लक्ष नसल्याचं पाहात त्याने ती बिअर पिऊन टाकली. पण बिअर प्यायल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो जागेवरच कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने बारमध्ये खळबळ उडाली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णलायत नेलं पण भगवान गेडाम याचा जागीच मृत्यू झाला होत
या प्रकरणी पोलिसांना पाचरण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. भगवाने ज्या ग्राहकाची उरलेली बियर प्यायली त्या बियरमध्ये विषारी द्रव्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीअभय लांडे ग्राहकाने ती बियर मागवली होती. मात्र, अभयचा आत्महत्या करण्याचा विचार होता. यासाठी त्याने बिअरच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळलं. पण अर्धी बिअर प्यायल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो तिथून निघून गेला
मात्र, पण अभय लांडेने बिअरच्या बाटलीत विष मिसळलं असल्याचं वेटर भगवान गेडामला माहित नव्हतं. त्याने तीच बियर प्यायली आणि दुर्देवाने त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्याला आत्महत्या करायची होती तो जगला आणि ज्याला जगण्याची इच्छा होती त्याला मृत्यूने गाठलं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून विषारी बिअरची बाटली वैद्यकिय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.