विशेष

लग्नापूर्वी प्रेझेंट दिलेला पोपट परत घेतल्याशिवाय घटस्फोटास नकार 

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

एखाद्याचे पक्षीप्रेम किती असू शकते, फार-फार तर तो काही पक्ष्यांचा सांभाळ करेल. मात्र, एका पक्ष्याच्या ताब्यासाठी घटस्फोटाचा निकाल रखडून राहण्याचा प्रकार तसा दुर्मीळच. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात असाच एक प्रकार समोर आला आहे.

               जगात असे काही विचित्र प्रकार घडत असतात की त्यावर काय बोलावे ? इतकच काय तर प्रतिक्रिया द्याव्या अथवा नाही ? असा विचार पडतो.आता ज्या घटनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो प्रकार देखील विचित्र  कक्षेतच मोडतो. लग्न होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला असताना पती पत्नी वेगळे राहू लागले.त्यानंतर पत्नीने घटस्फोटा साठी अर्ज दाखल केला. पतीने घटस्फोटास संमती दिली. पत्नीने ही खावटी चा दावा सोडला. पण फक्त एका पोपटा मुळे घटस्फोट अडला. पतीचे असे म्हणणे होते की जोंपर्यंत पत्नी त्याने गिफ्ट केलेला पोपट परत देत नाही . तोपर्यंत तो घटस्फोटाच्या पेपर वर हस्ताक्षर करणार नाही.

प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर एकमेकांच्या सुखादु:खात साथ देणारे दाम्पत्य म्हणजे रवी आणि साधना (काल्पनिक नावे ). दोघांनीही 11 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयात लग्नगाठ बांधली. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना वैचारिक मतभेदामुळे 14 सप्टेंबर 2021 पासून वेगळे राहू लागले. नातेवाईक तसेच कुटुंबीयांच्या मध्यस्थीनंतरही त्यांना एकत्र येण्यामध्ये उत्साह राहिला नाही. अखेर, साधनाने घटस्फोट मिळावा यासाठी 9 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयात अर्ज केला. यादरम्यान, साधनाआणी रवी  यासही समुपदेशनासाठी पाठविण्यात आले.

त्यानंतरही पती घटस्फोटावर ठाम राहिला. साधना ने  रवी कडून  मिळणारा पोटगीचा हक्क सोडून देत दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचे मान्य केले. पोपट दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पत्नीनेही पोपट देण्यास संमती दिली. त्यानंतर विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी 16 नोव्हेंबर 2023 पूर्वी पोपट पतीकडे सुपूर्त करण्यात यावा, असे नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्याकडे पाठविला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पूर्ण झाले होते. दोघेही एक वर्षापेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close