सापाला ही लागले भोजपुरी गाण्याचे वेड
सापाला ही लागले भोजपुरी गाण्याचे वेड
सोशल मीडियावर प्राण्यांच्या वेगवेगळ्या कृतीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून तर घरातील पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथपर्यंत ठिक. पण तुम्हाला जर सांगितले की सापा सारखा प्राणी देखील मोबाईल वर लागलेले गाणे ऐकतो किंवा पाहतो तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ मध्ये जे दिसत आहे ते खरंच धक्कादायक आहे. चला तर पाहू या काय आहे या व्हिडिओत.
याच क्रमात, एका व्हिडिओमुळे लोकांची झोप उडाली आहे. हा व्हिडिओ एका सापाशी संबंधित आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक साप असे काही करताना दिसत आहे की जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हायरल होत आहे धक्कादायक व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईलसमोर एक साप असल्याचे दिसेल. तुम्हाला मोबाईलवर भोजपुरी गाण्याचा व्हिडिओ चालू असल्याचे दिसेल. यामध्ये भोजपुरीतील ट्रेंडिंग स्टार खेसारी लाल यादव यांचे गाणे वाजताना दिसेल. साप मोबाईलकडे पाहत आहे. जणू काही तो त्याच्या मोबाईलवर गाणे पाहत आहे असे दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणतात की सापालाही भोजपुरी गाण्यांचा वेड लागलं आहे. सर्वप्रथम तुम्ही हा आश्चर्यकारक व्हिडिओ पहा-
व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की खेसारी लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांचे प्रसिद्ध गाणे ‘तूट जय राजा जी पलंग सांगवान के’ मोबाईलवर वाजत आहे. मोबाईल जमिनीवर ठेवला आहे आणि साप गाण्याकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना विश्वासच बसत नाहीये. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर sanatani_suraj_yadav_87 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
अर्थात रात्रीच्या वेळेत शिकारीच्या शोधात निघालेल्या या सापाला प्रकाश दिसल्यामुळे तो ती वस्तू नेमकी काय आहे ? त्यामुळे त्याच्या जीवाला धोका तर नाही ना याचा अंदाज घेत असावा. या दरम्यान एखाद्या व्यक्तीने तो व्हिडिओ व्हायरल केला असावा.