Uncategorized

महिलेवर धावत्या कार मध्ये बलात्कार 

Spread the love
प्रतिनिधी /  पुणे
                     पब संस्कृतीने केवळ तरुणाईलाच नाही तर मध्यमवयीन महिलांना देखील भुरळ पाडली आहे. पण यात अतिप्रमाणात मद्य प्राशन केल्याने तरुणी आणि महिलांवर अत्याचाराच्या घटनां देखील घडत असतात. अशीच घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. एका महिलेवर पार्टीतून बाहेर पडल्यानंतर घरी सोडून देण्याच्या नावाखाली कार मध्येच अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
             मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती. याच पार्टीदरम्यान तिची ओळख एका पुरुषाशी झाली. पार्टी संपल्यानंतर रात्री उशिरा हॉटेलबाहेर पडताना, संबंधित पुरुषाने महिलेला तिच्या घरी सुरक्षित सोडतो असं सांगून विश्वासात घेतलं आणि तिला आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, मुंढवा ते कोरेगाव पार्क रस्त्यावरून कार जात असताना, आरोपीनं गाडीतच महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि चालत्या कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पार्टीमधील ओळख पडली महागात
पीडित महिला आणि आरोपी पुरुष यांची आधीपासून कोणतीही ओळख नव्हती. काही तासांपूर्वीच हॉटेलमधील पार्टीत त्यांची तोंडओळख झाली होती. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कारमध्ये बसणं महिलेला महागात पडलं. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
     कोरेगाव पार्क पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या हॉटेल परिसरातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका महिलेवर अशाप्रकारे धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close