विदेश

कोण आहे ती महिला जिचा पत्ता देणाऱ्याला अमेरिकेने घोषित केले आहे २ कोटींचे बक्षीस 

Spread the love
                 गुप्तहेर या शब्दातच अशी किमया आहे की हा शब्द ज्या व्यक्तीच्या मागे जोडला जातो त्याचे वेगळे वर्णन करायची काही आवश्यकता नसते. पूर्वी गुप्तहेर या शब्दाची महत्ती चित्रपटाच्या माध्यमातून समजायची. पण आता सोशल मीडियाच्या युगात अजित डोबाल सारख्या गुणवंत अधिकाऱ्याचे किस्से वाचले की या पदात किती जोखीम असते हे आपसुकच समजते. 

 

 

 

 

 सध्या सुरु असणाऱ्या इराण अमेरिका युद्धामध्ये अशाच एका गुप्तहेर महिलेची चर्चा सुरु आहे, जिनं अमेरिकेच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. ही महिला अधिकारी अमेरिकी लष्करात सेवेत असली तरीही ती काम मात्र इराणसाठी करत होती असं म्हटलं जातं. तिनं केलेल्या कामामुळं एकिकडे ट्रम्प यांच्या चिंतेत भर पडलेली असतानाच आता या देशाला ही महिला अधिकारी कोणत्याही स्थितीत ताब्यात घ्यायची आहे. ज्यासाठी तिच्या नावे कोट्यवधींची रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाईल असं जाहीर करण्यात आलंय.

अमेरिकेतून डबल क्रॉस करणाऱ्या या महिलेचं नाव आहे मोनिका विट. फक्त अमेरिकाच नव्हे, तर जिथंजिथं अमेरिकी गुप्तहेर पोहोचू शकतात त्या सर्वच ठिकाणी तिचा शोध घेतला जात आहे. एफबीआय या अमेरिकी यंत्रणेनं देशाच्या या माजी गुप्तहेर महिला अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी जो कोणी मदत करेल त्याला 2 कोटींचं बक्षीस देण्याचीसुद्धा घोषणा केली आहे. अमेरिकेचा विश्वासघात तरत इराणसाठी हेरगिरीर करून ट्रम्प यांच्या देशाती बरीच गोपनीय आणि तितकीच संवेदनशील माहिती इराणपर्यंत पोहोचवण्याचा आरोप या महिला हेरावर आहे. तिनं अशी माहिती इराणला दिली आहे, ज्यामुळं अमेरिका धोक्यात येऊ शकते. ज्यामुळं या प्रकरणानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.

मोनिका विट आहे तरी कोण?

FBI मध्ये नोंद असल्यानुसार मोनिका विट 1997 ते 2008 पर्यंत अमेरिकी वायुदलात इंटेलिजेंस स्पेशलिस्ट पदावर कार्यरत होती. यानंतर तिनं अमेरिकी सरकारसाठी कंत्राटी तत्त्वावर कामसुद्धा केलं, ज्यादरम्यान बरीच संवेदनशील माहिती तिच्यापर्यंत पोहोचली आणि तिला हाताळता आली. हीच माहिती मोनिकानं इराणच्या अनेक वाहिन्यांपर्यंत पोहोचवली.

तपास यंत्रणांच्या आरोपानुसार 2013 मध्ये मोनिका इराणला गेली आणि तिथंच तिनं अमेरिकेबाबतची माहिती या देशाला पुरवण्यास सुरुवात केली, ज्यामुळं इतर देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकी हेर आणि त्यांच्या कुटुंबांना असणारा धोका वाढला. एफबीआयच्या अधिकाऱ्यांनुसार अमेरिकेच्या संविधानाची शपथ आणि विश्वास मोनिकानं मोडला आहे, ज्यामुळं आता तिचा शोध घेतला जात आहे. इराणमध्ये कोणीतरी असं नक्कीच असेल ज्याला मोनिका विटची माहिती असेल आणि आम्ही तिचा लवकरच शोध घेऊ असा निर्धार अमेरिकेनं केला असून, सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत तिनं नेमकी कोणती आणि किती माहिती इराणला पोहोचवली आहे, याचीच धास्ती अमेरिकेला लागून राहिली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close