क्राइम

6 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

Spread the love
आर्वी /” ,विशेष प्रतिनिधी 
                   आपल्या मामाला शोधण्यास शेजारच्या घरी गेलेल्या 6 वर्षीय बालकावर नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आर्वी तालुक्यातील शिरपूर बोके येथे घडला आहे. पीडित बालकाच्या मामाच्या तक्रारी वरून संबंधित आरोपीवर पोक्सो सह बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
               या बद्दल अधिक माहिती अशी की फिर्यादी पवन पुंजारामजी गायकवाड (23) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार ते शिरपूर बोके ता. आर्वी येथे राहतात.त्यांच्या घराच्या काही अंतरावर आरोपी धनराज श्यामराव कांबळे राहतो. घटनेच्या दिवशी दि 1 जुलै 2023 रोजी त्याची पत्नी साक्षी आणि पीडित भाचा हा त्याला शोधण्यासाठी निघाले असता पत्नी घरी परतली. फिर्यादी हा घराकडे जात असताना त्याला कांबळे याच्या घरासमोर त्याच्या चपला पडल्या दिसल्या. त्यामुळे त्याने भाच्याला आवाज दिला. तेव्हा धनराज याने आतून काय आहे ? असा आवाज आला. त्यामुळे पावन हा घरात गेला असता त्याला धनराज आणि भाचा नग्न अवस्थेत पलंगावर झोपलेले दिसले.
        पवन याने  भाच्याला घरी आणले आणि जावई यांना सोबत घेऊन भाच्याला विश्वासात घेतले आणि धनराज याने काय केले अशी विचारणा केली असता त्याने धनराज याने त्याच्या सोबत गैरकृत्य केल्याचे सांगितले.याची वाच्यता  केल्यास पेटवून देण्याची धमकी दिली . त्यावरून पवन गायकवाड याने पो.स्टे. आर्वी येथे येऊन तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी धनराज कांबळे याच्या विरोधात कलाम 377 ,506 , बाल लैंगीक अत्याचार संरक्षण कायद्याच्या कलाम 4, 8 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close