सामाजिक
Related Articles
Check Also
Close
बेंगळुरू / नवप्रहार मीडिया
कर्नाटक च्या बेंगळुरू मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे फुटपाथ वरून पायी चालणाऱ्या पाच महिलांना एका कार चालकाने चिरडले आहे. त्यात एकीचा मृत्यू झाला आहे. तर चार गंभीर जखमी आहेत. काही वेळाने कार चालकाने आत्मसमर्पण केले आहे.
घटना18 ऑक्टोबर ची आहे व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला फूटपाथवरून चालताना दिसत आहेत. यावेळी एक भरधाव कार त्यांना पाठीमागून जोरदार धडक देते. कारचालक आधी फूटपाथवरून चालणाऱ्या चार महिलांना तर धडकतो, पुढे वळताना आणखी एका महिलेला उडवतो. धक्कादायक बाब म्हणजे 5 महिलांना धडक देऊनही चालक गाडी थांबवत नाही.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक महिलांच्या मदतीसाठी धावून येतात. या अपघातात 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, तर एकीचा मृत्यू झाला आहे. रुपश्री असे मृत महिलेचे नाव आहे. रूपश्री ही सुरथकल भागातील रहिवासी होती. या घटनेत जखमी झालेल्या उर्वरित 4 महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कमलेश बलदेव (57) असे कार चालकाचे नाव आहे. कमलेश याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. या घटनेनंतर कमलेशने आपली कार एका शोरूमजवळ उभी करून तेथून पळ काढला. काही वेळाने त्याने वडिलांसोबत पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. याप्रकरणी कमलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कमलेशला अटक केली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |