क्राइम
माणुसकीला काळीमा फासणारी घटना, तीन अल्पवयीन मुली आणि तरुणीवर बलात्कार

बालाघाट / नवप्रहार ब्युरो
मध्यप्रदेश च्या बालाघाट जिल्ह्यातील हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे लग्न समारभातून परतणाऱ्या तीन अल्पवयीन मुली आणि एका तरुणीवर सात तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत लगेच कारवाईला सुरवात केली आणि तीन तासात आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
२३ एप्रिल रोजी २ वाजेच्या सुमारास मुली एका लग्न समारंभातून परतत होते. त्यांच्यासोबत एक मुलगाही होता. त्या ठिकणी सात तरूण दोन दुचाकीवरून आले. नराधमांनी त्या मुलाला हाकलून लावले आणि मुलींना निर्जनस्थळी घेऊन गेले. तसेच आळीपाळीने सातही तरूणांनी ४ मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
पीडित मुलींनी त्यानंतर २४ एप्रिलला हट्टा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितांनी तक्रार दाखल करताच पोलीस अधीक्षक नागेंद्र सिंह यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार केले. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली. लोकेश मात्रे, लालचंद खरे, अज्जू बगदाते, अजेंद्र बहे, राजेंद्र कावरे, मणिराम बहे आणि या आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे
आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेसंदर्भात एसपी नागेंद्र सिंह म्हणाले की, ‘घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे. आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळावून देण्यात यावी यासाठी प्रयत्न करू’, असं पोलीस अधीक्षक म्हणाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |