सेवानिवृत्त शिक्षकाचा निरोप संभारभ संपन्न
वरूड/तूषार अकर्ते
शे.घाट येथील नगर परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा शिक्षक मोहम्मद फारुख यांच्या सेवानिवृत्ती निमित्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मकसूद अहमद व प्रमुख अतिथी म्हणुन न.प.प्रशासन अधिकारी विजय बेलसरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नसीम खान तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने मोहम्मद फारुख यांना भेटवस्तू देऊन त्यांनी दिलेल्या सेवेप्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.सहकारी शिक्षकांनी मोहम्मद फारुख यांनी शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या वाढ व विकासाकरिता दिलेल्या योगदानाबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा सर्वानी आपल्या भाषणात दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शाळेतील शिक्षक मुश्ताक, रियाज, अय्युब , आयशा, अजीम, सिद्दीक अहमद यांनी मोलाचे सहकार्य केले.