विदेश

हायजॅक होणाऱ्या विमानबद्दल धक्कादायक माहिती ; विमान क्रॅश करण्याचा होता डाव

Spread the love

                प्लाय दुबईच्या हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या विमानाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानातील सहवैमनिक हमाम अल हम्मामी याचा मच्छार यांच्यावर हल्ला करून विमानावर ताबा मिळवून हे विमान कुठल्यातरी इमारतीवर किंवा विमानावर आदळण्याचा डाव होता असे तपासातून समोर आले आहे.  तसेच जुलै महिन्यातही त्याने अशी घटना घडवून आणण्याची योजना आखली होती, अशी माहिती समोर आली आहे.

फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या अपहरण नाट्याबाबत तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान, हमाम अल हम्मामीने सांगितले की, त्याला कॉकपिटचा कंट्रोल आपल्या ताब्यात घ्यायचा होता. तसेच उड्डाण सामान्यपणे चालू ठेवायचं होतं. तसेच विमान उतरवताना शेवटच्या क्षणी हे विमान कुठल्यातरी इमारतीवर किंवा अन्य विमानावर आदळवण्याचा त्याचा डाव होता.

दरम्यान, फ्लायदुबईचं विमान दुबईहून तेल अवीवला रवाना झाल्यावर सहवैमानिक असलेल्या हम्मामी याने वाटेत वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर आणीबाणीच्या वापरासाठी ठेवण्यात आलेल्या कुऱ्हाडीने हल्ला केला. मात्र स्मित मच्छार हे कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर विमानातील प्रवाशांनी हम्मामी याला पकडले. तर विमानात असलेल्या ऑफ ड्युटी वैमानिकांनी विमानाचं नियंत्रण सांभाळून ते सुरक्षितरीत्या खाली उतरवले.

जुलैमध्येही हल्ला करण्याचा होता डाव फ्लायदुबईच्या विमानाचं अपहरण करून घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या हमाम अल हम्मामी याने जुलै महिन्यात देखील इस्राइलमधील बेन गुरियन विमानतळावर एक विमान पाडण्याची योजना आखली होती. अशी माहिती आता समोर आली आहे. मात्र त्यावेळी हम्मामी याने ऐनवेळी आपला विचार बदलला होता. याबाबत इस्राइली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हम्मामी याने या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर त्याच्या या डावाबाबत कबुली दिली. हम्मामी जे विमान पाडण्याची योजना आखत होता. त्या विमानाच्या क्रूमध्ये त्याच्या एका मित्राचाही समावेश होता. त्यामुळेच त्याने कथितपणे ही योजना रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close