सामाजिक

शिंगणापूर चौफुली झाली अपघात प्रवनस्थळ ; दीवसें दिवस अपघातात वाढ

Spread the love

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
सामाजिक कार्यकर्ते सूर्यपाल चव्हाण यांचा आरोप

नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर येथील चौफुलिवर दि.१८ फेब्रुवारी रोजी मन हेलावून टाकणाऱ्या अश्या अपघातामध्ये अमरावती येथील चार युवकांचा मृत्यू झाला असल्याने संपूर्ण विदर्भात हळहळ व्यक्त होत आहे. याआधी सुद्धा शिंगणापूर चौफुलीवर अनेक अपघात झाले असून त्या अपघातामध्ये एकापेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे येवढे अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत याठिकाणी कोणतीही उपाययोजना केलेली नाही अनेकदा मागणी करूनही या विभागाचे अधिकारी हे कुभकरणी झोपेत असल्याचा आरोप शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यपाल चव्हाण यांनी केला आहे तसेच या मागण्यांकडे या विभागाचे आमदार यांनी लक्ष देऊ नये यापेक्षा आणखी दुर्भाग्यपूर्ण कोणती बाब असावी असे सुद्धा सूर्यपाल चव्हाण यांनी म्हंटले आहे त्यांनी शिंगणापूर
चौफुलीवर एका पोलिस चौकीची नितांत आवश्यकता असताना सुद्धा येथे पोलीस चौकी मंजूर करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाने या ठिकाणी त्वरित पोलीस चौकी मंजूर करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या चौफुलीवर चारही बाजूने मजबुत गतीरोधक देण्याची मागणी केलेली आहे. औरंगाबाद नागपूर महामार्गावर गतीरोधक नाहीत तर अमरावती यवतमाळ मार्गावरील गतीरोधक सपाट होवुन नसल्यातच जमा झालेले आहेत त्यामुळे विनाविलंब या सर्व ठिकाणी वाहन चालकांना दिसेल असे मजबूत स्पीड ब्रेकर देण्याची मागणी केली आहे.सदर ठीकाण हे अपघाताचा ब्लॅक स्पाॅट ठरले असुन आतापर्यंत अनेक अपघात घडून तीसाहुन अधीक जणांचे येथे अपघाताती मृत्यु झाले आहेत तरी ही येथे अपघात प्रवणक्षेत्र दर्शवीणारे मोठे फलक चौफुलीच्या चारही बाजुने ठळक अक्षरात तयार करून फलक लावण्यात यावे.चौफुलीवर अतिक्रमण करून अनधीकृत अवैध टप-या उभारण्यात आल्या आहेत या मुळे डाव्या व उजव्या बाजुने येणारे वहाने चालकांना दिसत नाहीत त्यामुळे येथे नेहमीच अपघात घडतात.अपघात होण्याचे हे मुख्य कारण आहे त्या मुळे आजूबाजूची ही सर्व अतीक्रमणे त्वरीत हटवीण्यात यावीत.आता पर्यंत अनेक वेळा प्रशासनाने यांना अतीक्रमण हटवीण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत पण कारवाई मात्र झाली नाही ही कारवाई वेळीच झाली असती तर अनेक निष्पाप जीव वाचले असते असे सुद्धा चव्हाण यांनी म्हंटले आहे.रस्त्यावरील डीव्हायडर आणी पंख्यांमुळे रस्ते खुप अरूंद झाले आहेत त्यांचा विस्तार करण्यात यावा.तसेच रस्त्याच्या कडेला अनेक प्रवासी आटो उभे असल्याने वाहन चालकांना अरुंद रस्त्यावरून वाहने न्यावी लागतात यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व वाहन चालकांना दुसरी पर्यायी जागा देऊन रस्ता मोकळा करण्यात यावा.रस्त्याच्या कडेला प्रचंड झाडे झुडपे वाढलेली असून यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे या रस्त्याच्या चारही बाजूची झाडे झुडपे कापण्याची मागणी त्यांनी केली असून या चौफुलिवर स्वयम् चलीत सिग्नल देण्यात यावे.. अश्या मागण्या सामाजिक कार्यकर्ते सूर्यपाल चव्हाण यांनी केलेल्या आहेत याकडे सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले असून या सर्व मागण्या त्वरित मान्य न केल्यास गावकर्यासह चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारासुद्धा त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.सदरचे निवेदन नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार याना देण्यात आले असून या निवेदनावर सूर्यपाल चव्हाण यांचेसह
विरेंद्र देशमुख,धनंजय निंबर्ते,प्रशांत देशमुख,प्रल्हाद खंदहार प्रदीप देशमुख,संजय मते यांच्या सह्या आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close