शाहरुख खानच्या त्या देश विरोधी कृत्याचा ? सगळ्या स्तरावरून निषेध

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
बांग्लादेशात हिंदू तरुणाला जिवंत जाळण्यात आल्यावर याठिकाणी अस्थिरता पसरली असून अराजकता माजली आहे. या घटनेचा अख्खे जग विरोध करत आहे. पण फिल्म स्टार आणि केकेआर संघाचा मालक शाहरुख खान याने बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला ९.२ कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. यामुळे अख्या देशात नाराजी पसरली असून त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.
बांगलादेशामध्ये सद्यस्थितीत हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि तेथील राजकीय अस्थिरता यामुळे संपूर्ण भारतात चिंतेचे वातावरण आहे. तिथे सातत्याने हिंदूंची घरे जाळली जात असून अनेक निष्पाप हिंदूंना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत आयपीएलच्या लिलावादरम्यान शाहरुख खान मालक असलेल्या कोलकाता नाईट रायडर (KKR) संघाने बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला ९.२ कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. अभिनेता शाहरुख खान मालक असलेल्या या संघाच्या या निर्णयावर आता देशभरातून कडक शब्दात टीका केली जात आहे. एकीकडे देश सुरक्षेच्या प्रश्नावर झुंजत असताना दुसरीकडे शत्रू राष्ट्राला साथ देणाऱ्या देशाच्या खेळाडूंवर पैशांची उधळण करणे, हे अनेकांना देशविरोधी कृत्य वाटत आहे.
सध्याच्या काळात सीमेवरील तणाव आणि देशांतर्गत सुरक्षा हे विषय अत्यंत कळीचे बनले आहेत. बांगलादेशातील हिंसाचार आणि तिथे वाढलेला भारतविरोधी सूर पाहता, अशा प्रकारे बांगलादेशाच्या खेळाडूवर मोठी रक्कम खर्च करणे हे सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. समाजमाध्यमांवर यावरून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात असून खेळापेक्षा देश महत्त्वाचा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
भारताच्या सुरक्षेला धोका आणि चिकन नेकचा कट
भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणारा ‘चिकन नेक’ म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर सध्या शत्रू राष्ट्रांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील काही कट्टरपंथी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय हे मिळून भारताचे तुकडे करण्याचे षडयंत्र रचत आहेत. चीनच्या मदतीने हा भूभाग भारतापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे भारताच्या अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा संवेदनशील काळात बांगलादेशाशी असलेले क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शाहरुख खान आणि केकेआरवर टीकेची झोड
बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली असून विविध स्तरांतून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दिपू दास हे एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होते. त्यांच्यावर ईश निंदा केल्याचे खोटे आरोप लावून बांगलादेशातील (Bangladesh) धर्मांध मुसलमानांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना जिवंत जाळले. या अमानुष कृत्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल केला. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केवळ अफवांच्या आधारे एका निरपराध तरुणाचा बळी घेतल्याने जगभरातील मानवतावादी संघटनांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेने भारतात हिंदू संतप्त झाले असताना दुसरीकडे आयपीएलमध्ये शाहरुख खान यांच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने मुस्तफिजूर रहमानवर ९.२ कोटी रुपये खर्च केल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ज्या देशातील शासन आणि संघटना भारताच्या विरोधात कारस्थान करत आहेत, त्याच देशाच्या खेळाडूला इतकी मोठी रक्कम देणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे मत मांडले जात आहे. या कृत्यामुळे शाहरुख खान यांच्यावर देशविरोधी असल्याचा आरोप केला जात असून, आगामी काळात या वादाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर उमटण्याची दाट शक्यता आहे.
हिंदूंचे शिरकाण आणि वाढता हिंसाचार
बांगलादेशातील सत्तापालटानंतर तिथे हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. अनेक मंदिरांची विटंबना करण्यात आली असून महिला आणि बालकांवरही अमानुष अत्याचार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनांचा निषेध होत असला, तरी तिथे परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अशा वेळी भारतीय नागरिकांच्या भावना दुखावणारे निर्णय व्यावसायिक संस्थांनी घेऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोलकाता संघाने यापूर्वीही बांगलादेशी खेळाडूंना प्राधान्य दिल्याने आता त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीम तीव्र होताना दिसत आहे.

