विदेश

अमेरिकेच्या एअर फोर्स मध्ये हाहाकार , B – 52 बॉम्बर विमान कोसळले

Spread the love
 
           अमेरिकेच्या हवाई दलातील अत्यंत महत्वाचे विमान समजल्या जाणारे B -52 उड्डाणाच्या काही सेकंदा नंतर कोसळल्याने लष्करात हाहाकार माजला आहे. कारण B- 52 हे बॉम्बर विमान असून अमेरिकन सैन्याची ती मोठी ताकद आहे. 

विमानातील एकही जण वाचू शकला नाही. हा अपघात इतका भीषण होता की, काही सेकंदात सर्व संपले. विमानात असलेल्या सर्व अमेरिकी ठार झाले. यापैकी एकही जण वाचू शकले नाही. अपघातानंतर मोठी आग विमानाला लागल्याची माहिती मिळतंय. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी या विमानात 8 जण होते. अमेरिकेच्या हवाई दल तळाने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:20 वाजता घडली.

ज्यावेळी हा विमान अपघात झाला, त्यावेळी विमान आपल्या नियमित मोहिमेवर होते. 8 अमेरिकी या विमानात होते. घटनेनंतर आगीच्या ज्वालांसोबतच मोठा धूर निघाला. एडवर्ड्स एअर फोर्स बेसचे कर्नल जेम्स हेस यांनी या अपघातानंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, आज या हवाई तळावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 8 उत्कृष्ट अमेरिकन नागरिकांचा बळी गेला.
हा अपघात इतका भयंकर होता की त्यात कोणाच्याही वाचण्याची शक्यता नव्हती. विमानात लष्करी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगारही असल्याचीही माहिती त्यांनी दिली. हा विमान अपघात नक्की कसा झाला, याचा तपास केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही तांत्रिक कारणामुळे इतका मोठा आणि भयंकर अपघात झाला असावा.
तपासाला सुरूवात झाली असून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ अपघाताचे कारण पुढे येण्यास लागण्याचा अंदाज आहे. कारण अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे विमान जळून खाक झाले. त्यामुळे तपास करणाऱ्या यंत्रणांपुढे मोठे आवाहन आहे. B-52 बॉम्बर विमान हवाई तळाच्या रडार आधुनिकीकरण कार्यक्रमात मदत करत होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानांवरील नियंत्रण सुटले आणि त्याला आग लागली. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close