क्राइम

महिलेने त्याला ऊसाच्या शेतात बोलावून कापला प्रायव्हेट पार्ट 

Spread the love

हरदोई (युपी ) / विशेष प्रतिनिधी

               हरदोई येथे प्रेम प्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने लग्न केल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकराला ऊसाच्या शेतात भेटायला बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्ट कापला. तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार सुधीर याचं 6 मे रोजी लग्न झालं होतं. सुधीरचे त्याच्याच भावाच्या बायकोसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुधीरने लग्न केल्यामुळे आरती त्याच्यावर प्रचंड नाराज होती.

ऊसाच्या शेताने बोलावून वार

आरतीने सुधीरला चर्चेच्या बहाण्याने गावाबाहेर असलेल्या एका ऊसाच्या शेतात बोलावलं. तिथं दोघांमध्ये जोरदार वाद झाले. याचा वादातून रागाच्या भरात आरतीने धारदार ब्लेडनं सुधीरच्या गुप्तांगावर वार करून ते कापलं. घटनेनंतर सुधीर रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला. त्याचा आरडाओरडा ऐकून त्याचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याला तातडीने समुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सुधीरची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि आगमपूर तिराहून आरोपी आरतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close