जिहादी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या फरहान चे शॉर्ट एन्काऊंटर
भोपाळ / नवप्रहार ब्युरो
..आपल्या मैत्रिणींच्या साह्याने हिंदू मुलींना प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या त्याची अश्लील चित्रफित बनविणाऱ्या आणि त्यांना ब्लॅकमेल व टॉर्चर करणाऱ्या फरहान ला दोन सख्ख्या बहाणींनी केलेल्या तक्रारी नंतर अटक करण्यात आली आहे. पण पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरहान चे शॉर्ट एन्काऊंटर करण्यात आले आहे.
आरोपीचं नाव फरहान असं आहे. तो हिंदू मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर अत्याचार करायचा. जिहादी व्हायचं त्याचं स्वप्न होतं.
फरहान हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याच्या तयारीतमध्ये होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली. त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. हमीदिया हॉस्पिटलमध्ये फरहानवर उपचार सुरु आहेत. लव्ह जिहाद प्रकरणात एकूण ५ एफआयआर दाखल झाले आहेत. सर्वच प्रकरणातमध्ये फरहान हा आरोपी आहे.
भोपाळ झोन-१ च्या डीसीपी प्रियंका शुक्ला यांनी या घटनेची पुष्टी करत सांगितलं की, पुरावे गोळा करण्यासाठी अशोक गार्डन पोलिस ठाण्याची एक टीम फरहानला बिलकिसगंज गावात घेऊन जात होती. रस्त्याने फरहानने टॉयलेटला जाण्याचं कारण सांगून गाडी थांबवायला सांगितली आणि संधीचा फायदा घेतला.
फरहानने पोलिस उपनिरीक्षकाची पिस्तुल हिकसावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झटापट झाली आणि पोलिसाच्या बंदुकीतून गोळी सुटली. गोळी फरहानच्या पायाला लागली. जखमी आरोपी फरहानला तातडीने हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे.
अशोका गार्डनचे ठाण्याचे प्रभारी हेमंत श्रीवास्तव यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की, शुक्रवार, दि. ११.३० वाजता ही घटना घडली. रातीबड भागामध्ये फरहान टॉयलेटसाठी थांबला होता. तो गाडीतून उतरला तेव्हा पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल त्याच्यासोबत गाडीतून उतरले. याचवेळी फरहानने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिकसावण्याचा प्रयत्न केला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, यावेळी झटापट झाली आणि गोळी फरहानच्या डाव्या पायावर लागली.