क्राइम

मृतदेह बोलला आणि अनैतिक संबंध बाहेर आले

Spread the love

पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क

पती दारुड्या असल्याने तो नेहमी त्रास देत असायचा. त्या त्रासाला कंटाळलेल्या बायकोचे गावातील युवकासोबत सूट जुळले. पण नवरा प्रेमसबंधात अडसर ठरत असल्याने दोघांनी मार्गातील हा काटा दूर करण्याचा बेत आखला. नवरा बाहेर झोपला असतांना बायको आणि प्रियकराने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. आणि मृतदेह विहिरीत नेऊन टाकला. बायकोने नवऱ्याच्या मिसिंग ची तक्रार दाखल केली. मृतदेह वर आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह पाहिल्यावर पोलिसांना संशय आला. आणि ……

यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भांडगाव येथे सुनील जगताप आणि शीतल जगताप हे दाम्पत्य राहत होते. शीतल जगताप हिचा नवरा सुनील हा दारू पित असे. त्यातच शीतल आणि गावात राहणारा अतुल चौगुले या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने शीतल जगताप व तिचा प्रियकर अतुल चौगुले या दोघांनी १५ मे २०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुनील जगताप घरासमोर झोपलेला असताना डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

त्यानंतर पत्नी शीतल हिने बुधवारी (१७ मे) रोजी यवत पोलिस ठाण्यात आपला पती सुनील जगताप हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१८) या बेपत्ता असलेल्या सुनील जगताप याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आला. यवत पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी सुनीलच्या पत्नीकडे विचारपूस केली. सुनीलची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर दोघांनी संगनमताने त्याचा खून केल्याचे समोर आले. तसेच खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला, तर रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळून पुरावा नष्ट केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी यवत पोलिसांनी शीतल जगताप आ

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close