हटके

गाडी सोडवण्यासाठी त्या मुलाने केलेले नाटक पाहून महिला अधिकाऱ्याला देखील हसू आवरले नाही

Spread the love

 रस्त्यावरून वाहन चालविताना वाहतूक नियम पाळणे बंधनकारक आहे. असे न केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पण, अनेक जण तशा कारवाईचा प्रसंग ओढवल्यानंतर पोलिसांना विविध सबबी सांगू लागतात.

                 वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीसाठी बंधनकारक असते. पण अनेक लोक वाहतूक नियम मोडतात. आणि वाहतूक पोलिसांकडून पकडल्या गेल्यावर त्यांच्या कडे असलेल्या क्लुप्त्यांचा वापर करतात. काही वेळा ते त्यात यशस्वी होतात. सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा वाहतूक पोलिसां समोर गयावया करुन आपली स्कुटी सोढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा वडिलांची स्कूटी घेऊन मस्त मजेत निघाला होता. काही अंतरावर पोहोचताच त्याला महिला वाहतूक पोलीस पकडतात आणि गाडीच्या चाव्या काढून घेतात. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो मुलगा अशी काय नाटकं करतो की, जी पाहिल्यानंतर तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आपल्या मित्रांबरोबर स्कूटीवरून कुठेतरी जात असतो. यावेळी त्या स्कूटीवर बसलेल्या तिघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते. अचानक महिला वाहतूक पोलिसाचे लक्ष या मुलाच्या स्कूटीच्या दिशेने जाते आणि त्या त्यांना थांबवतात. पोलिसांना पाहून मुलगा घाबरतो आणि जोरजोरात रडायला लागतो. पोलिस काही बोलायच्या आधीच तो मोठमोठ्याने रडून ‘माझी गाडी सोडा’ अशी विनवणी करू लागतो. मुलगा पोलिसांना रडवेला होत सांगतो की, काकी, प्लीज माझी गाडी सोडा; नाही तर पापा तुला मारतील.

यावेळी त्याचे दोन मित्र अगदी शांतपणे जाऊन बाजूला उभे राहतात. मात्र, तो मुलगा महिला पोलिसांच्या पाया पडून गयावया करीत गाडीची चावी परत देऊन, सोडण्याची विनंती करू लागतो. मुलगा ज्या प्रकारे रडण्याचे नाटक करतोय, ते पाहून महिला वाहतूक पोलिसही हसू लागतात.

हा व्हिडीओ एक्सवर @prof_desi नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या मुलाने केलेल्या अॅक्टिंगने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यासाठी मुलाला ऑस्कर देण्याची विनंती केली आहे. अनेकांनी त्या मुलावर दया दाखविण्यास सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यावर लोकही मजेशीर कमेंट्स करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3