क्राइम

इन्स्टाग्राम वर मैत्री , तरुणीचे लैंगिक शोषण ; तरुणाला अटक

Spread the love

भंडारा / नवप्रहार मीडिया 

              इंस्टाग्राम वर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत तरुणाने तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात ती सात महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तरुणीच्या तक्रारी नंतर तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक कऱण्यात आली आहे.  मनीष सुरेशराव सोनवणे 23 असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित 20 वर्षीय तरुणी आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर जानेवारी 2022 मध्ये ओळख झाली. जून 2022 मध्ये आरोपी हा पीडितेस सेंदूरवाफा येथे मामाच्या स्वागत समारंभात घेऊन गेला. तिथे उशीर झाल्याने रात्री अकराच्या सुमारास आरोपीने पीडितेस साकोली येथील लॉजवर नेले. तिथे लग्नाचे खोटे आमिष दाखविले. तसेच तिच्या तीन वर्षांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर आरोपीने पीडितेचे अनेकदा लैंगिक शोषण केले. एकदा मारहाणही केली होती. तिचे वारंवार शोषण झाल्यामुळे ती सात महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी आरोपीविरोधात साकोली ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील उईके करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close