रांधे येथील मंदीरांचे दुरस्ती च्या कामांचा शुभारंभ .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – रांधे येथील श्री रांधु आई , श्री विठ्ठल रुक्मिणी , श्री खंडोबा या मंदिरांच्या दुरुस्ती कामांचा शुभारंभ गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
ग्रामस्थ व रांधुबाई देवस्थान ट्रस्टच्या यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळा असल्या कारणाने गावचे ग्रामदैवत श्री रांधु आई मंदिरातील सभामंडपाचे छत , मागील भिंत, श्रध्दास्थान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराचे संपूर्ण छत आणि माळावरील श्री खंडोबा मंदीराच्या कळस नव्याने जिर्णोद्धार करणे कामी दुरुस्ती , मंदीर परिसर सुशोभिकरण अश्या अंदाजे १० लाख रुपये दुरुस्ती कामांचा शुभारंभ गावातील ज्येष्ठ , प्रतिष्ठित , पदाधिकारी , कार्यकर्ते , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला .
हे सर्व ग्रामदैवत असलेल्या दैवतांच्या मंदीर दुरुस्ती ची कामे नुकत्याच झालेल्या आजी , माजी सरपंच , उपसरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष , सेवा संस्थेचे आजी व माजी चेअरमन , संचालक आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत अंदाजे १० लाख रुपये खर्चाचे नियोजना नुसार ग्रामस्थ , भाविक भक्ती , मंडळाच्या योगदानातून करण्यात येणार आहे , तरी या कामांसाठी भाविक भक्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ही ग्रामस्थांनी केले आहे .