पतीच्या मृत्यूवर अती ॲक्टिंग भोवली, पोलिसांना संशय आला अन्……


पाटणा / विशेष प्रतिनिधी
घरात वस्तू अस्ताव्यस्त
या तपासात न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि जिल्हा गुप्तचर विभागाचाही सहभाग होता. सुरुवातीला, चोरीच्या उद्देशाने केलेल्या हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला होता; खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या आणि मोबाईल फोनही गायब होते. मात्र तपासदरम्यान पोलिसांना अशा काही गोष्टी आढळल्या ज्या चोरीच्या सिद्धांताशी विसंगत होत्या. पोलिसांचा संशय प्रामुख्याने मयताची ३३ वर्षीय पत्नी डेझी परवीन हिच्या जबाबांवर बळावला, कारण चौकशीदरम्यान ती वारंवार आपली विधाने बदलत होती. हीच विसंगती पुढे संपूर्ण प्रकरण उलगडण्यात निर्णायक दुवा ठरली.
गावातील तरुणाच्या संपर्कात
जेव्हा पोलिसांनी डेझी परवीनचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरु केली, तेव्हा या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागले. घटनेच्या आधी आणि नंतरही ती गावातीलच रहिवासी असलेल्या २४ वर्षीय अन्वर हुसेनच्या सतत संपर्कात होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली. चौकशीदरम्यान असे उघड झाले की, डेझी परवीन आणि अन्वर हुसेन यांच्यात गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
पती १३ वर्ष कुवेतला
डेझीशी लग्न झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांनी रिझवान नोकरीसाठी कुवेतला गेला होता आणि सुमारे १३ वर्षांनंतर परतला होता. या काळात पती-पत्नीमधील दुरावा वाढला, तर दुसरीकडे डेझी आणि अन्वर यांच्यातील जवळीक अधिक घट्ट झाली. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध दावे केले जात असले, तरी पोलिसांनी अधिकृतपणे प्रेमसंबंध आणि त्याला पतीचा असलेला विरोध हेच या हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे.
त्या दोघांनी रिझवानचा काटा काढण्याचा कट रचला. घटनेच्या रात्री डेझीने मुद्दाम घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिच्याकडील एका वेगळ्या मोबाईलवरुन अन्वरला बोलावले. त्यावेळी रिझवान गाढ झोपेत होता. खोलीत प्रवेश करताच अन्वरने रिझवानच्या डोक्यावर लोखंडी सळईने वारंवार प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की रिझवानचा जागीच मृत्यू झाला.
पुरावे मिटवण्याचा प्रयत्न
हत्येनंतर, त्या दोघांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चोरीच्या उद्देशाने केलेल्या हत्येचा भास व्हावा, यासाठी त्यांनी खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या. त्यानंतर त्यांनी रिझवान आणि डेझी या दोघांचेही मोबाईल सोबत घेतले; वाटेत त्यांनी ते दोन्ही फोन बंद केले आणि गावात वेगवेगळ्या ठिकाणी पुरून टाकले.




