क्राइम
लखनऊ येथील बाथरूम कांड ने देश हादरला


याच्या पुढे निळे ड्रम कांड, राजा रघुवंशी आणि केतन अग्रवाल कांड फिके
लखनऊ / विशेष प्रतिनिधी
देशात पती, प्रियकर, भावी नवऱ्याला संपविण्याचा अनेक घटना घडत आहे. राजा रघुवंशी, केतन अग्रवाल यांचे प्रकरण चर्चेत असताना लखनऊ मधून या सगळ्या हत्याकांडांना मागे टाकणारे हत्याकांड समोर आले आहे. येथे एका पत्नीने आपल्या नवऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूम मध्ये पुरवला.आणि त्यावर प्लास्टर करून टाकले. स्वतः पती गायब असल्याचा कांगावा करत राहिली. भावाला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबद्दल कळवले.पोलिसांनी संशयाच्या आधारावर बाथरूम मध्ये खोदकाम केल्यावर त्यांना मृतदेह सापडला.पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
४४ वर्षीय सुरेंद्र आग्यातील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहायचे. प्राक्षी टॉवर चौकी परिसरात सुरेंद्र त्यांची पत्नी आणि २ मुलांसह वास्तव्यास होते. ते १८ मेपासून बेपत्ता झाले. सुरेंद्र अचानक गायब झाल्याचं त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं. सुरेंद्र यांच्या भावाला संपूर्ण घटनाक्रमाबद्दल संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घरी येऊन तपास सुरू केला. संशय आल्यानं त्यांनी बाथरूममध्ये खोदकाम केलं. यावेळी फरशी सुरेंद्र यांचं शव सापडलं.
पतीचं शव बाथरूममध्ये पुरल्यानंतर पत्नीनं तिथे प्लास्टर केलं होतं. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही. सुरेंद्र यांचं शव त्यांच्याच घरात, बाथरूममध्ये सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सुरेंद्रच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
सुरेंद्रचं शव पोलिसांनी उत्तरीय चाचणीसाठी पाठवलं
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूबद्दल अधिकची माहिती मिळू शकेल. ही घटना उजेडात आल्यानंतर परिसरात दहशत पसरली आहे. स्थानिक उलटसुलट चर्चा करत आहेत. या प्रकरणी सगळ्या शक्यता गृहित धरून तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1




