क्राइम

बळीराम सोबत केतन आणि राजा पेक्षाही भयंकर घडल 

Spread the love
हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले
मुंबई / विशेष प्रतिनिधी
             सध्या विवाहबाह्य संबंधामुळे पती / पत्नीच्या हत्येत जबरदस्त वाढ झाली आहे. प्रियकराच्या मदतीने पती किंवा प्रेमिका पती किंवा तरुणाचा इतक्या अमानुषपणे खून करत आहे की ते वाचल्यानंतर मात्र अंगावर शहारे उभे राहतात. आणि खरंच महिला इतक्या निर्दयी असू शकतात का ? असा काळजाला भिडणारा प्रश्न सहज स्पर्शून जातो.
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात केतन अग्रवाल खून प्रकरण गाजत आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयलने आपला प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघांनी केतनला लोहगडावरून धक्का देऊन  मारल्याचं तपासातून समोर आलं आहे. हे प्रकरण ताजं असताना आता नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातून धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे. कट सुनिता आणि राहुल यांनी रचला होता. हा कट यशस्वी करण्यासाठी सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी मावशीकडे पाठवले.
त्यानंतर 9 ऑगस्ट 2025 च्या रात्री बलीराम गाढ झोपेत असताना सुनिता आणि राहुल यांनी प्रथम त्यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच बलीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. त्यांनी मुंडकं, धड आणि पाय गोण्या आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
हत्येनंतर सुनिताने यादव नगरमधील आपलं घर भाड्याने देऊन मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे वास्तव्यास सुरुवात केली. जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत चौकशी केली. तेव्हा सुनिताने भांडण करून घर सोडून गेला, असं सांगून वेळ मारून नेली. मात्र संशय बळावल्याने मृतकाच्या भावने  एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल आणि सिमकार्ड बदलून नवे हँडसेट वापरण्यास सुरुवात केली. मात्र तांत्रिक तपासादरम्यान राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनिताशीच सातत्याने संपर्क होत समोर आले. याशिवाय सुनिता समोर आले. याशिवाय सुनिता प्रत्येक चौकशीत पतीबाबत वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर कसून चौकशी केली असता, दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली.
आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र गुन्हा घडून तब्बल 11 महिने उलटल्याने अवशेष शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close