क्राइम

कर्नाटकात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती 

Spread the love

कर्नाटकात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती 

महालक्ष्मीचे अनेक तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले 

लव्ह जिहाद की प्रेमप्रकरण ? 

बेंगळूरू / नवप्रहार डेस्क 

             कर्नाटक राज्यातील बेंगळूरू येथून एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. अश्रफ ने महालक्ष्मी नामक २६ वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेहाचे ३० पेक्षा जास्त तुकडे करून ते फ्रिज मध्ये ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणामुळे दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर  हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हा प्रकार लव्ह जिहाद की आणखी काही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 बेंगळुरूमधील मल्लेश्वरम येथील व्यालिकावल निवासी भागातील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. तीन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून मुस्लिम व्यक्ती अश्रफने महालक्ष्मीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील व्यालिकावल पोलीस स्टेशन ( परिसरात घडली आहे. मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३० हून अधिक तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. व्यालिकावल आणि शेषाद्रिपुरम पोलिसांनी घटनास्थळी तपास केला आहे. तीन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही हत्या ४ ते ५ दिवसांपूर्वी घडली होती

अतिरिक्त पोलीस आयुक्त सतीश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही घटना घराच्या पहिल्या मजल्यावर घडली असून ती चार ते पाच दिवसांपूर्वी घडली असावी. मृत महिला दुसऱ्या राज्यातील असून ती कुटुंबासह बेंगळुरू येथे राहत होती. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली जाईल, असे आयुक्त सतीश कुमार यांनी सांगितले. फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृताची ओळख पटली आहे. त्याची माहिती लवकरच दिली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची कसून चौकशी केली असून, यामध्ये १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील व्हिडिओ तपासले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. हत्येपासून बेपत्ता असलेल्या महालक्ष्मीचा मोबाईल आणि हत्येत वापरलेले हत्यार याचा शोध पोलीस घेत आहेत. हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत.

दिल्ली ते वसई कनेक्शन असलेल्या ‘त्या ‘घटनेची आठवण

महालक्ष्मीच्या हत्येने दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत २०२२ मध्ये, श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने तिचा खून केला होता. यामध्ये श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि अनेक दिवस घराच्या फ्रिजमध्ये ठेवले. महालक्ष्मीच्या मृतदेहाचेही तुकडे करून त्याच पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते, त्यामुळे हे प्रकरण श्रद्धा वालकर प्रकरणासारखेच असल्याचे दिसून येते.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close