अरे हे काय भलतच…. येथे चक्क भाड्याने घ्यावे लागतात पती


स्त्री भ्रूण हत्येमुळे स्त्री आणि पुरुषाच्या प्रमाणात मोठी तफावत आढळून येतं आहे. त्यामुळें तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे दुरापास्त झाले आहे. ही समस्या केवळ भारतामध्येच नाही तर जगतील अनेक देशात आहे. पण काही देशात याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या कमी आहे. आणि त्यामुळे येथे तरुणींना पुरुष भाड्याने घ्यावे लागतात.
जसं लिंगगुणोत्तरामध्ये असलेल्या असमानतेचा फटका हा भारतला बसत आहे, तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त फटका हा जगातील इतर देशांना देखील बसत आहे. मात्र तिथे भारताच्या अगदी उलट चित्र आहे, या देशामध्ये पुरुषांची संख्या कमी झाल्यामुळे येथील सुंदर तरुणींवर पतीला भाडे करारावर घेण्याची वेळ आली आहे.
लातविया देशामध्ये सध्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं येथील महिलांवर पती रेंटने घेण्याची वेळ आली आहे, अशा पुरुषाला या देशात तासाप्रमाणे पैसे दिले जातात. या देशातील सुंदर तरुणी पती म्हणून ज्या पुरुषाला रेंटने घ्यायचं आहे, त्याच्यासोबत विशिष्ट असा भाडेकरार करतात, त्याला त्यानुसार दर तासाच्या हिशोबाप्रमाणे पैसे दिले जातात. या महिला त्यानंतर या पुरुषाकडून घरातील सर्व कामे करून घेतात. या देशात जास्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं अशा पुरुषांचा उपयोग हा मेहनतीचे कामे करून घेण्यासाठी देखील केला जातो.
द न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार लातविया देशामध्ये पुरुषांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळे येथील महिलांवर पुरुष भाड्यानं घेण्याची वेळ आली आहे. येथील महिला घरातील कामांसाठी पुरुष भाड्यानं घेतात, त्याला दर तासाला 3 ते 4 डॉलर एवढा मोबदला दिला जातो. त्याच्याकडून घरातील सर्व मेहनतीची कामे करून घेतली जातात, तसेच काही महिला पती म्हणून देखील पुरुष भाड्यानं घेतात, त्याला देखील तेवढाच मोबदला दिला जातो.
अशा पुरुषांची बुकिंग ही वेबसाईटच्या माध्यमातून केली जाते. एका रिपोर्टनुसार काही विशिष्ट वेबसाईट अशा प्रकारच्या सेवा देतात, या महिला या वेबसाईटवर आपल्या गरजेनुसार पुरुष भाडे करारावर घेतात. त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो.


