क्राइम
भावजय, पुतण्या आणि पुतनी वर तलवारीने वार तिन्ही ठार

अडीच एकर शेतीसाठी तीन खून
सोलापूर / विशेष प्रतिनिधी
देशात जितके फौजदारी खटले नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने दिवाणी खटले सुरू आहेत. यात जास्तीतजास्त जमीन , प्लॉट किंवा अन्य विवादाला घेऊन आपसी खटले सुरू आहेत. जमीन वादातून एका माथेफिरूने आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला, पुतण्याला आणि पुतणीला संपवल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. गच्चावर झोपलेल्या भावजय, पुतण्या आणि पुतनीवर तलवारीने सपासप वार करून तिघांना संपवतो. पुतण्यावर तो निर्दयीपणे 49 वार करतो. भावजय वर 16 तर पुतनीवर 6 .
शिवराज काकाला रोखण्याचा प्रयत्न करतो पण…
डोक्यात स्वार्थाचे भूत स्वार झालेला हा काका चार पावलांवरील स्टडी रूमकडे वळतो. इतक्यात रक्तबंबाळ शिवराज काकाला रोखण्याचा प्रयत्न करतो. रक्ताळलेल्या 16 वर्षीय शिवराजला हा नराधम काका स्टडी रूमच्या भिंतीवर दोनदा आदळतो आणि लेकीसमान प्रियाला देखील संपवतो. आता जीव वाचवण्यासाठी शिवराज गच्चीवरून
तळमजल्यावरील खोलीकडे धाव घेतो; पण व्यर्थ, खालच्या खोलीत आलेला काका सपासप वार करत शिवराजला संपवतो. पुन्हा छतावर येऊन गच्चीवरून स्वतःच्या घरात उतरतो. रक्ताळलेली तलवार आणि मोबाईल तेथेच टाकतो. घराला कुलूप लावून खावी नेहमीप्रमाणे दरवाजाबाहेर बुटात ठेवून परघर होतो.
शिवराजवर सपासप 49 वार
अडीच एकर जमिनीसाठी हैवान झालेला नराधम काका… एका रात्री कित्येकांचं आयुष्य संपवतो. सोलापूरमधील बोरामणी हत्याकांडात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चुलत्याने शिवराजवर एक दोन नाही तर सपासप 49 वार केल्याचं पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर शिवराजच्या आईवर त्याने 16 वार केले.
त्याशिवाय शिवराजच्या बहिणीवर त्याने 6 वेळा वार केले अन् तिला देखील संपवलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी 280 पानांचे दोषारोपत्र दाखल केलं असून 30 साक्षीदारांची नावं निश्चित केली आहेत.
दरम्यान, 16 वर्षाच्या शिवराजने मृत्यूपूर्वी आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर आली आहे. काका जेव्हा आईवर वार करत होता, तेव्हा शिवराज झोपेतून जागा झाला अन् त्याने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिथंही त्याच्यावर वार झाला. आईला संपवल्यानंतर काका पुतनीला मारायला निघाला तेव्हा अंगावर तलवारीचे वार खाललेल्या शिवराजने बहिणीला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली पण अखेर त्याला अपयश आलं. काकाने तिघांना मारून मनाची भूक शांत केली पण अखेर तो कायद्याच्या कचाट्यात सापडला.




