शेती विषयक

निवडणुकी नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी चे गिफ्ट ? 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                  हमीभावाचा अभाव, अतिवृष्टी , नैसर्गिक आफत यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती कडून कर्जमाफी चे गाजर दाखवण्यात येत आहे. महाविकास आघाडीने आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांचे 3 लाखा पर्यंतचे कर्ज माफ केल्या जाईल असे म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकार सत्तेत आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणुकी नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गिफ्ट मिळणार आहे असे म्हणने वावगे ठरू नये.

 सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बॅंकांचे कर्ज थकलेले आहे.त्या शेतकऱ्यांकडे विविध बॅंकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व वाशिम या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ५६ ते २०० कोटींपर्यंत थकबाकी आहे. मात्र, उर्वरित २७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडील थकबाकीचे प्रमाण ४०० ते २८५७ कोटींपर्यंत आहे. त्यातील जालना, बुलढाणा, परभणी, पुणे, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, धुळे, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नगर या १७ जिल्ह्यांतील शेतकरी सर्वाधिक थकबाकीत असल्याचेही त्या आकडेवारीतून दिसते. सध्या बॅंकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी देखील थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा ठोठावत आहेत.

दुसरीकडे खासगी सावकारांकडूनही तगादा सुरु आहे. अशा परिस्थितीत अडचणीतील बळिराजा संकटाच्या चक्रव्युवहात सापडला असून राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात बोलताना महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देईल, अशी ग्वाही दिली. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांच्या वचननाम्यात तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हटणार आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींसह युवक व शेतकरी आता प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळत आहे.

शेतकरी थकबाकीची स्थिती

  • एकूण शेतकरी
  • १,३१,३४,८१९
  • शेतकऱ्यांकडील एकूण कर्ज
  • २,४९,५१० कोटी
  • थकबाकीदार शेतकरी
  • १५,४६,३७९
  • शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज
  • ३०,४९५ कोटी

सर्वाधिक थकबाकीचे १७ जिल्हे

  • जिल्हा थकबाकीदार शेतकरी थकबाकी (कोटीत)
  • जालना १,३२,३७० १६३५
  • बुलढाणा १,०९,५०२ १०४८
  • परभणी १,०५,५४७ ११८०
  • पुणे ८९,१३२ २३१२
  • नांदेड ८८,५६५ ९०७
  • यवतमाळ ८८,३६० १८२७
  • वर्धा ६९,६८६ ८६२
  • सोलापूर ६७,३०६ २६२६
  • धाराशिव ३८,५१७ ९११
  • नाशिक ६३,३८५ २८५७
  • नागपूर ४३,६९७ १०१२
  • कोल्हापूर २३,६६५ १००१
  • धुळे ४१,९४६ ७९४
  • बीड ६७,७१० ११५२
  • छ.संभाजीनगर ६६,०४४ १३८१
  • अमरावती ६०,६३८ ९६१
  • नगर ४८,२८३ १२८४
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close