राजकिय

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Spread the love

बुलढाणा / विशेष प्रतिनिधी 

                  राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला आहे. त्यामुळे या दोन्ही आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केल्या जात आहे. आरोपांचे उत्तर आरोप करून दिल्या जात आहे. अश्यातच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आज जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ बुलढाण्यात प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“२०१४ च्या लोकसभेच्या भाजपाला सर्वाधिक खासदार विदर्भाने दिले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्यारोबर होतो. भाजपाला सर्वाधिक आमदारही याच विदर्भानेच दिले होते. पण इतकं सगळं दिल्यानंतरही विदर्भातल्या किती लोकांना यांनी नोकऱ्या दिल्या? एकाने तरी हात वर करून सांगावं. पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. एकातरी शेतकऱ्यांनी मला हात वर करून सांगावं की त्यांचे उत्पन्न दुप्पट झालं? एकाजरी शेतकऱ्याचे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगितलं तर मी आता या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“भाजपावाल्यांची आणि मोदींची आम्हाला कमाल वाटते आहे की ते चोर-दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर चालून येतात. भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम त्यांनी निर्माण केला वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे त्यांचे तंगडं धरुन त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून नाही दिलं तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही”. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“बाहेरच्या राज्यातून या लोकांना प्रचारासाठी लोक आणावे लागत आहेत. यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भात फिरून गेले. एक नारा देऊन गेले की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असं करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच “माझ्या बरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठिशी आहेत. योगीजी तुमच्या महायुतीकडे बघा. तुमच्या गुलाबी जॅकेटवाले म्हणाले बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करु नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता?” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close