क्राइम

नाशिक येथे गजवा ए हिंद चा भयानक प्रकार उघड 

Spread the love

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नाशिक / विशेष प्रतिनिधी

नाशिक येथील अशोक खरात , अमरावती जिल्ह्यातील परतवाडा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील महिला / तरुणी अत्याचार , आयटी कंपनी धर्मांतरण ,आणि अवयस्क मुली बेपत्ता प्रकरण ताजे असताना नाशिक येथून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलीला प्रेमात ओढून रिसॉर्ट मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार आणि धर्मपरिवर्तना साठी दबाब टाकत ‘ गजवा ए हिंद ‘ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

 

नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करून मानसिक त्रास देत त्यांचा बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता आणखीन एक अशाच काहीसा पद्धतीचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित तरुणीकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.

 

संशयीत आरोपी तंजीर इनामदार याने पीडित तरुणीला विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या हातात हात घेऊन मिठी मारत मुलीच्या गळ्याजवळ चावा घेतला. लव्ह बाईट असल्याचे सांगत मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले. जानेवारी 2026 मध्ये मोबाईल मध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर तिला जबरदस्ती लॉजमध्ये नेऊन दारू सिगरेट पाजून तरुणीचे कपडे काढत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावरील धागे काढत एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे ‘गजवा ए हिंद’ करण्यास मुलीला सांगितले. मुलीचे लैंगिक शोषण करत बळजबरी धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याचे आरोपींच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. यात तरुणीला एकवेळेस लॉजवर नेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून यामध्ये नेमकं गजवा ए हिंद त्याचा अर्थ काय? आणि गजवा ए हिंद कशासाठी म्हटलं? हे माहीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचे प्रकरण ताजे असतानाच हे प्रकरण समोर आल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना अजूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात आयटी कंपनीतील प्रकाराविरुद्ध महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंचवटीतील या प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार लव्ह जिहादाचा असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे.

 

आरोपींची पोलीस कस्टडीत चौकशी

आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही वेगळ्या धर्माचे असून प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात ओढून पीडितेचे शोषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महागड्या लॉजवर घेऊन जाण्यासाठी पैसे कुठून आले? यात कुणाचे आर्थिक पाठबळ आहे का? याचा तपास करण्यासाठी कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार पंचवटी लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी तंजीर इनामदार याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढचे पाच दिवस आता या प्रकरणाची पोलीस कोठडीमध्ये चौकशी होणार आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? हे पोलीस तपासात समोर येणार असून नेमकं गजवा ए हिंद हा काय प्रकार आहे? हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close