Uncategorized

यवतमाळात ड्रिब्लिंग बॉल या नवीन खेळाचा लोकार्पण सोहळा यवतमाळच्या मातीतच तयार झालेला नवीन खेळ

Spread the love

 

यवतमाळ वार्ता अरविंद वानखडे 

यवतमाळ जिल्ह्याच्या मातीतच तयार झालेल्या ड्रिब्लिंग बोल या नवीन खेळाचा लोकार्पण सोहळा जिल्हा क्रीडा संकुल नेहरू स्टेडियम येथे रविवार दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता यवतमाळ याशिम मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते होणार आहे.

 

ड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र ड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन आणि यवतमाळ जिल्हा ड्रीब्लिंग बोल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री मदन भाऊ येरावार मा. आमदार अशोक उईक मा. श्री. डॉ. पंकज आशिया जिल्हाधिकारी यवतमाळ मा श्री बाळासाहेब मंगुळकर मा. श्री देविदशजी गोपालानी प्रसिद्ध उद्योजक हिमालया ग्रुप ऑफ कंपनीज मा.श्री. बीपीन चौधरी अध्यक्ष स्लिंगशोट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र मा.श्री. डॉ. अमोल देशमुख अध्यक्ष जिल्हा शारीरिक शिक्षक व एकविध क्रीडा संघटना यवतमाळ जिल्हा मा. श्री. भाई अमन सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. तारीख भाऊ लोखंडवाला कार्यकारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. श्री. आनंद भुसारी सचिव एम.आय.डी.सी. मा.श्री. अरविंद गाबडा अध्यक्ष जागतिक ड्रीब्बलीग बॉल स्पोर्ट्स फेडरेशन मा. श्री नंदकिशोर खैरनार उपाध्यक्ष जागतिक ड्रीब्बलीग बॉल स्पोर्ट्स फेडरेशन मा. श्री. डॉ. संतोष कोकुलवार अध्यक्ष ड्रीब्बलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया मा. श्री गौरव सूचक अध्यक्ष ड्रीच्बलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमाला भारतातील 15 राज्याचे विशेष आमंत्रित प्रतिनिधी आणि राज्याच्या 27 जिल्ह्यातील प्रतिनिधी खेळाडू असे 300 खेळाडू व अधिकारी सहभागी होणार आहेत.

 

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वर्ल्ड, एशियन, इंडिया आणि महाराष्ट्र ड्रिब्लिंग बॉल खेळाच्या संघटनेचे विविध लोगो चे प्रकाशन केले जाईल तसेच ड्रिब्लिंग बॉल खेळा ची वेबसाइड खेळाच्या नियमावलीच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाईल. याच कार्यक्रमात दिल्ली, मणिपूर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू, चंदीगड, तेलंगाना, हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आधी राज्यातून आलेल्या ड्रिब्लिंग बॉल खेळाच्या राज्य प्रतिनिधिना संलग्नता प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल.

अशी माहिती ड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया चे सचिव व ड्रिब्लिंग बॉल खेळाचे जनक विकास शेळके यांनी पत्रकार परिषदेतून दिली पत्रकार परिषदेला मां. श्री अविनाश जोशी कोषाध्यक्ष एशियन ड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स फेडरेशन मा. शाहिद सय्यद सचिव एशियन ड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स फेडरेशन मां. श्री प्रा. निलेश भगत उपाध्यक्ष ड्रिब्लिंग बोल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया मा. श्री अमोल बोडदे उपाध्यक्ष ड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया मा.श्री. किशोर चौधरी कोषाध्यक्ष ड्रिब्लिंग बोल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया मा.श्री. राहुल ढोणे सहसचिवड्रिब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया मा.श्री प्रकाश उदासी सदस्य मा. श्री. गिरीराज गुप्ता. सदस्य मा. श्री प्रशांत उजवणे सदस्य मा. श्री यश ठाकरे सदस्य मा. श्री यश तुरंकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close