क्राइम

नालासोपारा हादरले आरिफ कडून 70 ते 80 हिंदू तरुणी आणि महिलांची फसवणूक 

Spread the love
वेगवेगळे आमिष दाखवून वाईट कृत्य 
मुंबई / क्राईम रिपोर्टर 
               सध्या देशात अल्पसंख्यांक म्हणवून घेणाऱ्या विशिष्ट समाजाच्या तरुणांकडून हिंदू तरुणींना हिंदू नाव धारण करून अथवा अन्य कुठल्याही मार्गाने प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडिओ बनवायचे.त्याच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचे. त्यांच्यावर लग्नाचा दबाब आणून लग्न करायचे आणि त्यानंतर त्यांच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाब टाकायचा हा ट्रेंड सुरू झाला आहे. काही वेळा जिम मध्ये जाणाऱ्या महिला आई तरुणींना देखील जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी समोर येत असतात. मुंबईतील नालासोपारा येथे देखील असाच प्रकार समोर आला आहे. 

एका तरुणाने 70 ते 80 महिलांची फसवणूक केली आहे. त्याने थेट तरुणींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो शूट केले आहेत. या प्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू आहे.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणींवर वारंवार नको ते कृत्य केले असल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघड झाला आहे. एका व्यायाम शाळेत मित्रांसोबत असताना ओळख झालेल्या तरुणाने, पीडित तरुणीशी सुरुवातीला ओळख करुन घेतली. हळूहळू ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिला वेगवेगळे आमिष दाखवून, तिच्यासोबत नको ते केले. त्यानंतर तरुणीने हिंमत करुन पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणातील आरोपीची चौकशी केल्यानंतर जवळपास ७० ते ८० हिंदू तरुणींना वेगवेगळे आमिष दाखवून, फसवून, त्यांच्यासोबत वाईट कृत्य केल्याचे समोर आले. तर काही तरुणींचे त्याने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काडून त्याचा गैरवापर केला असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

आरिफ अबू शेख असे मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपीची आई रुक्शाना, नातेवाईक साहिल खान यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील पीडित महिला ही हिंदू असून आरोपी हा मुस्लिम असल्याने, या प्रकरणात हिदुत्ववादी संघटनांनकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. मात्र याप्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर सत्य समोर येणार आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांनी मात्र आज दिवसभरात अधिकृत कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close