क्राइम
गाझियाबाद (युपी)/ नवप्रहार डेस्क
कुटुंबात नवरा आणि बायको नोकरीवर असले की त्या घरात घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी महिला मदतनीस ठेवल्या जाते. या ही घरात घरकाम आणि स्वयंपाक करायला महिला ठेवण्यात अली होती. पण ही महिला स्वयंपाक करताना असे काही करत होती की सगळे घर आजारी पडले. कुटुंबियांना शंका आल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यात जे कैद झाले ते पाहून कुटुंबियांची झोपच उडाली. .
आठ वर्षांपासून एक महिला या घरात जेवण बनवण्याचे काम करत होती. ती सर्व कुटुंबासाठी जेवण बनवत होती. मात्र जेवण बनवत असताना ती त्यात लघवी मिसळायची. या किळसवाण्या व अंगावर काटा येणाऱ्या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घरमालकाने स्वयंपाकघरात सीसीटिव्ही लावले. महिलेच्या या कृत्यामुळं हळूहळू घरातील सर्व सदस्य आजारी पडू लागले होते.
गाझियाबाद येथील एका सोसायटीत राहणाऱ्या रिअल इस्टेट व्यापारी आणि त्याचे कुटुंब गेल्या महिन्याभरापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. कुटुंबातील लोक पोटदुखी आणि लिव्हरच्या आजाराने ग्रस्त होते. सुरुवातीला साधारण इन्फेक्सन असू शकेल असं समजून डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र त्यात काहीच सुधारणा झाली नाही. जेव्हा प्रकृती अधिक खालावत गेली तेव्हा जेवणातच काहीतरी गडबड असावी, अशी शंका त्यांना आली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघर आणि अन्य ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावले. जेणेकरुन जेवणाच्या तयारीवर लक्ष ठेवण्यात येईल.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये जे दिसलं ते फारच धक्कादायक होते. घरात काम करणारी मदतनीस रीना जेवण बनवत असताना त्यात लघवी मिसळत होती. हे किळसवाणं कृत्यू पाहून कुटुंबीयांना एकच धक्का बसला होता. पीडित कुटुंबाने लगेचच तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली आहे. महिला 8 वर्षांपासून त्यांच्या घरी काम करत होती. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबातील लोक यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. सुरुवातीला इन्फेक्शन समजून डॉक्टरांना दाखवण्यात आले होते. मात्र काहीच फरक पडला नाही.
पोलिसांनी महिला मदतनीसाला अटक केली आहे. मदतनीस महिला लघवी एका भांड्यात जमा करुन ते जेवणात टाकत होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. पण या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |