मोदींजींच्या कार्यकाळाला 9 वर्ष ; जनतेशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री शहरात

अकोला / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली सुशासन विकास लोककल्याण सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल राज्यातील विकासाचा संकल्प घेऊन सामाजिक देशाला महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने वाटचाल करून घेण्यासाठी कार्यरत राज्याची उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस अकोल्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी गुरुवार आठ जून रोजी येत आहे.
खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल अनुप धोत्रे तेजराव थोरात किशोर पाटील यांच्या नेतृत्वात राज राजेश्वर नगर मध्ये विशाल जाहीर सभा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार असून यासाठी तयारी सुरू तसेच अकोला जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस घेणार आहे.
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कामकाजास निमित्त ते संवाद साधणार आहे.
क्रिकेट क्लब येथे विशाल जाहीर सभा होण्याच्या दृष्टीने जिल्हा भाजपा व भाजपा महानगर पदाधिकारी कामाला लागले असून भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्याकडे सभेची जबाबदारी देण्यात आली आहे तर विविध आघाडीचे पदाधिकारी नगरसेवक लोकप्रतिनिधी तसेच तालुका पदाधिकारी या जाहीर सभेत साठी प्रयत्नशील आहे हजारो अकोला नागरिक उपस्थित राहण्याच्या दृष्टीने भाजपातील विविध कार्यकर्ते ही चिंतक कामाला लागले आहे