शिवसेना कार्यालयात लेक लाडकी योजनेची महिलांनी एकमेकीला पेढे भरून केली सुरुवात, आठराव्या वर्षी मुलींना मिळणार एक लाख रुपये, मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्त्या उपस्थित

नेर:- नवनाथ दरोई
राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशा तीन पक्षाने मिळून बनवलेल्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून लेक लाडकी योजना अमलात आणण्यासाठी मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा केली. अंतिम प्रस्ताव राज्य महामंडळाने जाहीर केल्याने नेर येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी एकमेकींना पेढे भरून जल्लोष साजरा केला. महिलांनी सक्षम व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, मुलगी जन्माला आल्यास आई-वडिलांना तिचा बोजा वाटू नये, म्हणून मुलींचा जन्म होताच त्या कुटुंबीयांना या योजनेमार्फत पाच हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील. मुलगी जसजशी मोठी होईल तसेतसे रुपये वाढवून दिल्या जाईल. वयाच्या आठराव्या वर्षी त्या मुलीला 75 हजार रुपये दिले जाईल. असे एकूण त्या मुलीला एक लाख रुपये दिल्या जात असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. यावेळी वैशाली मासाळ,अर्चना इसाळकर, सुनंदा चव्हाण, छाया शिले, सुनिता जगताप,सारिका महल्ले, माधुरी आठवले, अलका नघाटे, जया सुरजुसे, ज्योती बुरांडे,प्रतिभा राठोड,जयश्री ईसूने,निर्मला संगेवार, सारिका दातीर, भूमिका चिरडे पायल राठोड,रमा ईसूने व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशावरून करण्यात आले.