सामाजिक

२५वर्षानंतर एकत्र घेऊन साजरा केला मैत्री मेळावा

Spread the love

२५वर्षानंतर एकत्र घेऊन साजरा केला मैत्री मेळावा

देवळी प्रतिनिधि

स्थानिक देवळी येथील जनता हायस्कूल येथील शैक्षणिक वर्ष १९९७ चा १० वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांनी देवळी येथील आठवण हॉटेल येथे मैत्री मेळावा कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून भैय्याजी बोडके सर,रमेश तेलरांधे सर,तसेच ऑनलाईन वर खेरड मॅडम या उपस्थिती होती
याप्रसंगी सुरुवातीला वर्गातील सहा विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच बोडके सर तेलरांधे सरांच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानतंर विद्यार्थ्यानी जुने आठवणीना उजाळा देत त्या वेळ सच्या गमती जमती सागितल्या
या प्रसंगी बोडखे सर यांनी सांगितले २७ वर्षानंतर परत आपण सर्व कुटुंबासहीत एकत्रित मिळत आहे तुमच्या चेहऱ्यावर हास्य व एकत्रित आल्याची भावना आपल्या दिसत आहे तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे एवढेच नव्हे तर जीवनात सत्याने वागा जीवनात सकारात्मक वुत्तीने वागा व आनंदाने जीवन जगा तिथे कुठे काम करता तिथे प्रामाणिकपणा ठेवा स्त्रियांचा सन्मान करा असे मार्गदर्शन केले तसेच रमेश तेलरांधे सरांनी तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी वर मात करा तुमच्या पाल्यांना शिकवा जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुच्या उपदेशाप्रमाणे चांगल्या गोष्टीच्या अवलंब करा विचारात तारतम्य ठेवा कुंटूबाकडे लक्ष घ्या असे मार्गदर्शन केले.संचालन प्रवीण नगराळे तर तर आभार दिनेश वैद्य यानी मानले.यशस्वीतेसाठी मोनाली चव्हान,छबू वैघ,अमर धांदे,गणेश क्षिरसागर,प्रविण कुमरे,किशोर आत्राम,अमित वरके,शोयब खान, संतोष तिवसकर,श्रीकांत लाबट,सुरेद्र शेर,पिटू कंगाले,गोपाल वाघाडे,महेश खाडे,आदिनी मोलाचे सहकार्य केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close