विदेश

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी घेतलेल्या औषधाने तरुणीला गमवावा लागला जीव

Spread the love

कुटुंबाने घेतला स्पृहणीय निर्णय ; अवयव केले दान 

लंडन  / नवप्रहार वृत्तसेवा 

                    नकळत मनुष्याच्या हातून अश्यया काही चुका घडतात की त्या सरळ जीवववर बेततात. मासिक पाळीत होणारा त्रास दूर करण्यासाठी घेतलेल्या औषधाने 16 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. या औषधाने तिच्या रक्तात गुठळ्या झाल्याने तिचा जीव गेला आहे.  घटना लंडन मधील असून लैला अस त्या तरुणीचे नाव आहे.

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळी घेण्याचा सल्ला तिला तिच्या मित्रांनी दिला होता. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या लैलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्या घेण्यास सुरुवात केली. मात्र, 5 डिसेंबरपासून तिला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आणि आठवड्याच्या अखेरीस तिला उलट्या होऊ लागल्या. दर 30 मिनिटांनी उलट्या होत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तीला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी पोटात किडे असल्याचे सांगत तिला एक गोळी खायला देत थोडी वाट पाहण्यास सांगितले.

तिचा त्रास वाढत चालल्याने आणि पलंगावर वेदनेने तडफडत असल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता तिच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होउन मेंदूला सूज आल्याचे दिसले. तिला रुग्णालयात आणत असताना ती बाथरूममध्ये पडली आणि बेशुद्ध झाली. मेंदूची गुठळी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला नेण्यात आले. मात्र, तेथे तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. लैलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पाच जणांचे प्राण वाचवण्यासाठी ख्रिसमसपूर्वी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close